वाईट बातमी, मिथुन चक्रवर्ती यांची तब्बेत अचानक बिघडली

मिथुन चक्रवर्ती हा अभिनेता बॉलीवूडच्या उत्तम अभिनेत्यांपैकी आणि नर्ताकांपैकी एक म्हणून गणला जातो. त्याच्या व्यावसायिक जीवनाची जितकी चर्चा झाली तितकेच त्याचे वैयक्तिक जीवनही चर्चेत राहिले. बहुतेक बॉलीवूडचा तो असा पहिला अभिनेता होता ज्याचे चित्रपट अतिशय कमी बजेटचे असूनही करोडोचा धंदा मिळवून द्यायचे.मिथुनचे नाव गौरांग चक्रवर्ती असे होते.१६ जून १९५० या दिवशी त्याचा जन्म झाला. आजही तो चित्रपटात सक्रीय आहे. याचे वय आता बरेच झाले आहे. त्याची तब्बेत हल्ली जास्त बरी नसते.

मिथुन चक्रवर्तीबदल अशी बातमी आली आहे कि तो अनेक दिवसांपासून आजारी आहे आणि त्याची प्रकृती खालावत चालली आहे.बॉलीवूड मध्ये डिस्को डान्सर या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता मिथुन चक्रवर्ती बर्याच काळापासून पाठदुखीने आजारी आहेत.त्याच्या या आजारावर इलाज करण्यासाठी काही दिवसांपूर्वी तो अमेरिकेला लॉस एंजेलिस येथे गेला होता.तिकडे इलाज सुरु असताना त्याला बरे वाटत होते. पण आता पुन्हा अशी माहिती आली आहे कि आता त्याला परत पाठदुखीचा त्रास सुरु झाला आहे. त्यामुळे त्याला दिल्लीच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले गेले अआहे. त्याचे उपचार सुरु आहेत पण हे सांगता येणार नाही कि त्याला बरे व्हायला नक्की किती वेळ लागू शकेल. हेही माहिती नाही कि ते दिल्लीमधील नक्की कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

वादात होते मिथुनचे व्यक्तिगत जीवन

डिस्को डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिथुनचे व्यक्तिगत आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे. त्याने त्याच्या करीयरची सुरुवात १९७६ साली मृगया या चित्रपटाने केली.आज अनेक मोठ्या चित्रपटात आपण त्याला पाहतो. बदलत्या काळाबरोबरच मिथुनच्या डान्समध्ये आणि अभिनयात उजाळा येतो आहे असे सांगितले जाते. मिथुनचे वैयक्तिक आयुष्य कधीही सोपे नव्हते. त्याच्या कौटुंबिक आयुष्याबाबत सांगायचे झाले तर त्याची दोन लग्ने झाली.त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव हेलेना ल्युक असे आहे. ७० च्या दशकात ती खूप प्रसिद्ध होती.

असे म्हणतात कि ती इतकी सुंदर होती कि बघताच मिथुन तिच्या प्रेमात पडला. त्यांचे लग्न आणि नंतर घटस्फोट झाला.त्यानंतर त्याचे आणि श्रीदेवीचे प्रकरणही खूप चर्चेत राहिले.त्या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते आणि बराच काळ एकत्र घालवला. पण त्यांनी लग्न केले होते कि नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *