वायरल झालेल्या या फोटोमधील गाडी चालवणारा ड्रायव्हर मन्या सुर्वे नव्हताच ! जाणून घ्या वास्तव

हा फोटो अनेक दिवसांपासून सोशल मिडीयावर वायरल होतो आहे. पण खरे तर यात काहीही तथ्य नाही, हा फोटो नक्कीच दिशाभूल करतो आहे. या वायरल होणार्या फोटोमध्ये जीपमध्ये छगन भुजबळ, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अजून काही महत्वाचे लोक एका रॅली मध्ये चालताना दाखवले आहेत. या फोटोत जो कोणी वाहनचालक दिसत आहे तो मन्या सुर्वे असल्याचे सगळे लोक म्हणत आहेत अन खरे तर हा माणूस म्हणजे मन्या सुर्वे नाही. होय, हा माणूस म्हणजे कुख्यात गुंड मन्या सुर्वे नाही. खरे काय ते घ्या जाणून.

वास्तव असे आहे कि १९८५ मध्ये छगन भुजबळ जेव्हा महापौर झाले तेव्हा ही रॅली निघाली होती. जीप चालवणारा माणूस म्हणजे मन्या सुर्वे नसून शिवसेनेचे एक शाखा प्रमुख होते असे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून मिळाले आहे. या व्यक्तीचे नाव काय आहे तेही लवकरच शोधून काढू असा निर्वाळा जुन्या शिवसैनकांनी दिला आहे. सत्य काय आहे ते बाहेर येईलच. लवकरच या वाहन चालकाचे खरे नाव आपल्याला कळू शकेल. सदर चित्रातला माणूस हा मन्या सुर्वे असू शकत नाही कारण ही रॅली १९८५ साली मिघाली होती आणि मन्याचा मृत्यू त्या आधी तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 1982 मध्ये झाला होता. म्हणूनच हे सिद्ध होते कि हा फोटो नक्कीच मन्या सुर्वे याचा नाही. मग असे काय झाले कि ज्यामुळे लोकांना तो वाहनचालक मन्या सुर्वे वाटला.? तो वाहनचालक आणि मन्या यांच्या चेहर्यातील साम्य हे कारण असू शकते.

आता नक्की कोण होता हा मन्या सुर्वे ? मनोहर सुर्वे किंवा मन्याभाई म्हणून हा कुख्यात गुंड ओळखला जायचा. शूट आउट अट वडाला हा चित्रपट मन्याच्या आयुष्यावर आधारित आहे. मन्या हा एक कुप्रसिद्ध गुंड होता, तो जर आज जिवंत असत तर नक्कीच स्थिती निराळी दिसली असती. तो चांगल्यासाठी क्रांती करत होता. आज जे काही लोक भारताविरुद्ध पाकिस्तान देशातून वाईट कारवाया करत आहेत तेच लोक भारत रदेशात १९९३ साली बॉम्बस्फोट घडवायला जबाबदार होते. जर आज मन्या जिवंत असत तर त्याने नक्कीच दाउद ला संपवले असते. मन्याने पूर्वी त्याच्या भावाला ठार मारले होते असे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *