शरीरातील रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय.

जेव्हा आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या हिमोग्लोबिनच्या सामान्य संख्येपेक्षा कमी होते तेव्हा या रक्ताच्या कमतरतेला एनिमिया असे म्हटले जाते. हा कोणता गंभीर आजार नाही पण काही इतर मोठ्या आजारांचे एक लक्षण मात्र असू शकते.

आपल्या रक्तातील लाल पेशी शरीरात ऑक्सिजनचे वहन करतात आणि शरीरातील विविध भागात ऑक्सिजन पोहोचवतात. जर रक्तात लाल पेशींची संख्या कमी असेल तर आपल्या शरीरातील विविध भागांपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचू शकणार नाही आणि आपल्याला थकवा जाणवू लागेल. मग ही ऑक्सिजनची कमी पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप जोरात श्वास घ्यावा लागेल. श्वास घेताना त्रास होईल, अशक्तपणामुळे चक्कर येईल आणि व्याकुळ वाटेल.

शरीरातील रक्ताच्या कमतरतेचे लक्षण

अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे

विस्मरण होणे

त्वचेवर अकाली सुरकुत्या पडणे

चालल्यावर किंवा काम केल्यावर श्वास लागणे

डोकेदुखी

जखम झाली असल्यास ती लगेच भरून न निघणे

हृदयाची धडधड वाढणे

रक्ताच्या कमतरतेमुळे

पोषक तत्वांची कमतरता

लाल रक्तपेशी नष्ट होणे

रक्ताशी संबंधित अनुवांशिक आजार होणे.

आयरन आणि विटामिन बी १२ ची कमतरता

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

एक ग्लास बीट रसात मध घालून किंवा डाळिंब रस दिवसातून दोनदा पिणे. याने शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वेगाने वाढेल. दोन चमचे तीळ दोन तास पाण्यात भिजवा. हे गाळून त्याची पेस्ट बनवून घ्या, त्यात एक चमचा मध घाला आणि त्याचे सेवन दिवसातून दोनदा करा.

चहा कॉफी जास्त पिऊ नका

शिंगाडे शरीरात रक्त आणि ताकद दोन्ही वाढवतात. कच्चे शिंगाडे खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वेगाने वाढते.

मनुका, किसमिस, डाळी व गाजर यांचे सेवन नियमितपणे करा. रात्री झोपण्याआधी दुधात खजूर घालून ते प्या.

पपई, सफरचंद लिंबू या सारख्या फळांचे सेवन तुमच्या आहारात वाढवा.

एक ग्लास टोमाटो चा रस रोज प्यायल्यानेही शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

लसणीची चटणी आहारात घेतल्यानेही शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य प्रकारे वाढते.

शरीरातील लोह वाढण्यासाठी हिरवे वाटाणे, अंडी, छोले, हिरवे चणे, मासे यांचे सेवन खूप उपयुक्त ठरते.

सोयाबीन हे शरीरातील रक्त वाढवण्यात खूप महत्वाची भूमिका बजावते. यात लोह तर असतेच पण श्रेष्ठ प्रतीचे प्रोटीनपण असते. सोयाबीनचे दुध प्यायल्यानेही खूप फायदा होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *