सकाळी उठताच प्रत्येक महिलेने करायला हवीत ही सहा कामे, उजळेल तुमचे नशीब

रोज सकाळी आपण एका नवीन दिवसाला सामोरे जायला सज्ज होतो. प्रत्येकालाच वाटते कि आपला दिवस हा चांगला जावा. उठल्याबरोबरच सगळे आपल्या आपल्या कामाला लागतात. प्रत्येकाचे एक वेळापत्रक असते त्याप्रमाणे काम करू लागतो. जर तुम्ही दहा जणांना विचारलेत तर त्यांचे वेळापत्रक वेगवेगळे असते. कधी हा विचार केलाय कि सकाळी उठून आपण जे कार्य करतो ते चांगले कि वाईट ?

आपण उठून जे काम करतो ते चांगलेच असे असे नाही. कधीतरी आपण सकाळी अशा चुका करून बसतो कि ज्याचा आपल्याला अंदाजही नसेल. या चुकींमुळे आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो. महिलांना खासकरून सकाळी काही गोष्टी करायला सांगितल्या जातात. चला घेऊ जाणून.

1) पाणी पिणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी रोज प्यायला हवे. काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो ही सवय चूक आहे. त्याने अनेक आजार होऊ शकतात. म्हणून चहा प्यायच्या आधी दोन ग्लास पाणी प्यावे. 2) महिलांनी सकाळी लवकर आंघोळ करायला हवी आणि मगच स्वयंपाक करायला हवा. याने अनेक फायदेही होतात. याने तुमचे रक्ताभिसरण सुरळीत होते आणि तुम्हाला नवीन उर्जा प्राप्त होते. 3) सकाळची सुरुवात विवाहित महिलांनी नवऱ्याबरोबर रोमान्स करून करावी याने दोघांचाही संपूर्ण दिवस चांगला जाईल.

4) साधारण प्रत्येक हिंदू घरात एक तुळशीचे रोप असते. जर तुमच्या घरी नसेल तर नक्की लावा आणि सकाळी त्याची पूजा करा. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे रविवार सोडून महिलांनी रोजच तुळशीची पूजा केली पाहिजे. असे केल्याने धन आणि अन्नाची कधीही कमतरता भासत नाही. 5) आजकालच्या धावपळीच्या जगात आपल्याला स्वतःसाठी वेळ काढणे खुप कठीण असते. खासकरून स्त्रियांना घरकामातून सुट्टी मिळत नाही व त्या स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाहीत. असे करू नये, सकाळी उठून कमीत कमी दहा मिनिटे योगा जरूर करा. योगा फक्त स्त्रिया नाही तर घरातील लहान मोठे सगळ्यांनीच करायला हवा   6) संगीत हे नेहमीच चांगले असते आपला मूड बदलून टाकते. सकाळी तुमच्या आवडीची गाणी ऐका म्हणजे तुमचा ताणतणाव दूर होईल. त्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही कामे करता करताही गाणी ऐकता येतात.

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *