ही आहे जगातली सगळ्यात काळी पण तरीही सुंदर दिसणारी मुलगी, पहा काही मनोरंजक चित्रे.

‘रंग बिरंगी दुनिया में भांति-भांति के लोग’ हे शाहरुख खानच्या चलते चलते चित्रपटातील सुप्रसिद्ध गाणे तुम्ही ऐकले असेलच. या गाण्यात योग्यच म्हंटले आहे कि या जगात प्रत्येक माणसाचे रंग रूप सारखे नसते. प्रत्येक माणसाचे आपले वेगळे,वैशिष्ट्य स्वभाव, सौंदर्य आणि रंग असतात. लोकांना काळा रंग साधारणपणे आवडत नाही.काळ्या रंगाचे लोक रंग उजळवण्यासाठी निरनिराळी सौदर्य प्रसाधने वापरताना दिसतात.सगळ्या काळ्या रंगाच्या लोकांची आदर्श ठरलेली न्याकिम गैटवेच हीने तिचा काळा रंग तिची कमजोरी नाही तर ताकद बनवली आहे आणि जगप्रसिद्ध झाली आहे. ही आहे जगातली सगळ्यात काळी पण तरीही सुंदर मुलगी. तिच्या चेहऱ्याने तिला ‘क्वीन ऑफ डार्क’किताब मिळवून दिला आहे.

ही फिचर इमेज पाहून तुम्हाला असे वाटले असेल क्की इतकी काळी मुलगी आहे तरी कोण. तुम्हाला हसूही आले असेल ही चित्रे पाहून. पण ह्यामागचे सत्य कळल्यावर तुम्ही टाळ्या वाजवाल. या मॉडेलचे नाव न्याकिम गैटवेच आहे आणि ही सुदानची राहणारी आहे. आता तुम्हाला असे वाटेल कि इतकी काळी असून ही मुलगी सुंदर कशी ? पण या मुलीने तिच्या रंगाने सगळ्या इंटरनेटजगतावर धुमाकूळ माजवला आहे आणि तिचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स आहेत. त्यांनीच तिचे टोपण नाव क्वीन ऑफ डार्क असे केले आहे.

आधी या मुलीला लोकांच्या उपेक्षेला सामोरे जावे लागले, इतक्या काळ्या रंगामुळे लोकांनी तिचा स्वीकार केला नाही. नियाकिम अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये जायची जिथे तिला नापसंत केले जायचे. पण तिने हिंमत दाखवून स्वतःच अनेक फोटोशूट केले आणि सोशल मिडियाचा वापर करून प्रसिद्धी मिळवली. इंस्टाग्रामवर तिचे अनेक फॉलोवर्स आहेत आणि तिच्या सगळ्या फोटोंवर खूप लाईक्स आहेत.

२७ जानेवारी १९९३ ला सुदान येथे जन्माला आलेली न्याकिम गैटवेच हिचे पालनपोषण अमेरिकेत झाले. शिक्षणाबरोबरच तिने मॉडेलिंगही केले. प्रसिद्ध मॉडेल होण्याचे तिचे स्वप्न होते पण तिच्या काळ्या रंगामुळे तिला बरेच नकार पचवावे लागले.पण आता ती देवाचे काळा रंग दिल्याबद्दल आभार मानते कारण या रंगामुळे तिचे वेगळेपण जपले गेले आहे. सुरुवातीला तिला सोशल मिडीयावर लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले पण आता तिने सगळ्यांना गप्प केले आहे. हळू हळू ती इंस्टाग्रामवर अवतरली आहे आणि तिच्या सकारात्मक विचारसरणीबद्दल ती असे म्हणते कि डार्क रंग असल्याने तिची त्वचा सूर्याची किरणे शोषून घेते. इंस्टाग्रामवर आपला फोटो शेयर करताना ती सांगते, आता तुम्ही हे म्हणू शकत नाही कि मी जादुई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *