१० वर्षांनी मोठ्या वाहिनीशी झाले १५ वर्षीय युवकाचे जबरदस्तीने लग्न,पहा काय घडले यानंतर

पटना –
ही बातमी बिहारची आहे जिकडे एका विधवेचे लग्न तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान दिराशी घरातल्यांनी जबरदस्तीने लावून दिले.घरच्यांना कदाचित माहिती नाव्हेते कि ते किती मोठी चूक करत आहेत.स्वतःपेक्षा १० वर्षांनी मोठ्या विधवा वाहिनीशी जबरदस्ती लग्न झाल्यानंतर १५ वर्षांचा मुलगा इतका दुख्खी झाला कि त्याने फास लावून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून लोक हैराण झाले आहेत.

वास्तविक १५ वर्षाच्या मुलाला याचे खूप वाईट वाटले कि त्याचे लग्न त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या विधवा वाहिनीशी लावण्यात आले. तो ही गोष्ट सहनच करू शकला नाही व लग्नाच्या दुसर्याच दिवशी त्याने फास लावून घेऊन स्वतःला संपवले. अहवालानुसार लग्नानंतर लगेचच तो पळून गेला होता, घरच्यांनी खूप शोधही घेतला पण त्याचा पत्ता कुठेच लागला नाही. लग्नाच्या दुसर्या रात्रीही तो घरातून गायब होता आणि दुसरयाच दिवशी घरच्यांना त्याचे लटकलेले प्रेत सापडले. ही गोष्ट कळल्यानंतर स्थानिक लोक खूप अस्वस्थ आहेत.

रिपोर्टप्रमाणे मुलाचे नाव महादेव होते जो नववीत शिकत होता. महादेव दासचा मोठा भाऊ संतोष दास याचा मृत्यु झाला ज्यानंतर घरच्यांनी त्याचे वाहिनीशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. या लग्नाला महादेव अजिबातच तयार नव्हता पण घरच्यांनी त्याचे काहीच ऐकून न घेता त्याचे लग्न बळजबरी लावून दिले. महादेवला हे सहन झाले नाही व त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. ही बातमी सगळ्या स्थानिकांच्या चर्चेत राहिली आहे.

ही गोष्टही समोर आली आहे कि महादेव दासचा मोठा भाऊ संतोषच्या दुर्घटनेत झालेल्या मृत्युनंतर त्याच्या वडिलांना भरपाई च्या रुपात ८० हजार रुपये मिळाले होते. हे पैसे रुबीच्या माहेरचे लोक मिळवू पाहात होते. पैसे आपल्याच घरात राहावेत म्हणून घरच्यांनी हे पाउल उचलले व धाकट्या मुलाचे वाहिनीशी जबरदस्तीने लग्न लावून दिले.पण त्यांना कल्पनाच नव्हती कि मोठ्या मुलाच्या मृत्युनंतर मिळणारे पैसे हे धाकट्या मुलाच्या मृत्यूचे कारण ठरेल.

जबरदस्तीने झालेल्या लग्नाच्या दुसर्याच दिवशी महादेव घरातून गायब झाला आणि घरच्यांना त्याचे फासावर लटकलेले प्रेत सापडले. ही गोष्ट खरोखरच खूप दुर्दैवाची आहे. ही बातमी ऐकून सगळे स्थानिक खूप अस्वस्थ झाले आहेत.पैश्याच्या हावेपोटी एखाद्या चांगल्या माणसाचा जीव जाणे हा खरोखरच दैवदुर्विलास म्हणावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *