दुकानदाराच्या लहानशा चुकीमुळे महिला झाली करोडपती,किंमत ऐकून व्हाल थक्क !

दुकानदाराच्या लहानशा चुकीमुळे महिला झाली करोडपती,किंमत ऐकून व्हाल थक्क !

काहीवेळा दुसर्यांच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचं नशीब बदलून जाते.दुसर्याची चूक ही समोरच्यासाठी फायद्याचा सौदा बनते.अशा चूका पाहून असे वाटते की कधीतरी माणसाने चूका केल्याच पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला अशा घटना सांगू की ज्या ऐकून आपणही यावर विश्वास ठेवाल आणि म्हणाल की अशा चूका सगळ्यांबरोबर होवोत.हे ऐकून आपण थक्क व्हाल की कशी एका दुकानदाराची लहानशा चुकीमुळे अमेरिकेच्या न्यू जर्सीत राहणारी महिला एका रात्रीत करोडपती झाली.

झालं असं की असे झाले की ओक्साझा ज़हारोव नावाच्या एका महिलेने लॉटरी तिकीट विकत घेतले. तिने दुकानदाराकडे $ 1 चे तिकीट मागितले पण दुकानदाराने चुकून तिला $ 10 चे तिकीट दिले. दुकानदाराची ही चूक तिच्यसाठी फायद्याची ठरली आणि एका रात्रीत ती करोडपती बनली.ओक्साना म्हणाली की ती मॅनहॅटन शहरात खरेदी करायला गेली होती. या दरम्यान ती एका दुकानात एक लॉटरी तिकीट खरेदी करायला गेली. तिने दुकानदाराला स्वस्तातलं म्हणजे १ डॉलरचे लॉटरीचे तिकीट मागितले होते पण त्याने तिला महाग म्हणजेच दहा डॉलर चे तिकीट दिले.यावर ती रागावली होती. त्यांनतर ती घरी परतली होती. काही दिवसांनी जेव्हा ते तिकीट तिने खोडून पाहिले तेव्हा तिचा तिच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिने आनंदाने उडीच मारली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिला एक दोन नाही तर चक्क पाच मिलियन डॉलर (जवळपास ३१ करोड ) ची लॉटरी लागली आहे.

तिने असे सांगितले की आजपर्यंत तिला कधीच लॉटरी लागली नव्हती म्हणून तिला हे सगळे खोटेच वाटत असे तरीही ती आपले नशीब अजमावत राहिली.पण यावेळी नशिबाने तिची साथ दिली व ती करोडपती बनली. जिंकलेल्या पैश्याचं काय करणार असं विचारल्यावर ओक्सानाने सांगितले की ती या पैश्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर परदेश फिरायला जाईल.तिचे स्वप्न आहे की ती तिच्या कुटुंबाबरोबर बहामात जाईल.  या व्यतिरिक्त, तीची अशी इच्छा आहे की या पैशाने ती तिच्या मुलांकरिता चांगले भविष्य देऊ शकेल. ही रक्कम त्यांना एकत्र दिली जाणार नाही, परंतु १९ हप्त्यांमध्ये पैसे त्यांना दिले जातील. १९ हप्त्यांमध्ये ५ मिलियन डॉलरची रक्कम पूर्ण केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *