मित्रांनो हल्लीचे आयुष्य खूप धावपळ व धकाधकीचे झाले आहे.यामुळेच आपण आपल्या हातापायाकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही आणि ते उन्हामुळे काळे पडतात किंवा आपण कधी हेही म्हणू शकतो की बाकी शरीराच्या तुलनेत आपले हात व पाय जास्त काळे पडतात आणि त्याचबरोबर उन्हात राहिल्याने आपला चेहराही काळा पडतो.

आपण आपल्या चेहऱ्याची तर खास निगा राखतो, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर इतका परिणाम दिसून येत नाही परंतु आपण हातापायाकडे अजिबात लक्ष देत नाही ज्यामुळे ते काळे पडतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहोत ज्याने तुम्ही तुमचे हात व पाय गोरे बनवू शकता, चला पाहूया ते उपाय.

मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला थोडे मीठ घ्यायचे आहे आणि त्याबरोबर थोडे नारळाचे तेल.मग तीन चमचे मिठात एक चमचा नारळाचे तेल मिसळून हे मिश्रण तुमच्या हातावर कमीत कमी पाच मिनिटे चोळून नीट मसाज करायचा आहे. त्यानंतर तुमचे हात लिंबू घातलेल्या पाण्याने नीट धुवायचे आहेत. असे जर तुम्ही आठवड्यातून दोनदा केलेत तर लौकरच तुमचे हात आणि पाय उजळतील.

मित्रांनो जर तुम्हाला ही बातमी आवडली तर कमेंट करून सांगा आणि लाईक व शेयर नक्की करा. अशा बातम्या आम्ही तुम्हाला रोजच देत राहू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *