पती व पत्नीच्या वयामध्ये असावे इतके अंतर, नाहीतर संबंधामध्ये पडतो वाईट प्रभाव…

माणसाने काळाबरोबरच बरीच प्रगती केली आहे. या वेगाने होणार्या प्रगतीने मानवजातीला चांगलेच प्रभावित केले आहे.एवढंच नाही तर बदलत्या काळाने माणसाच्या विचारसरणीलाही बर्याच प्रमाणात बदलून ठेवले आहे. आजच्या काळात अशा अनेक गोष्टी माणसासाठी सामान्य झाल्या आहेत तसेच काही गोष्टी होणे म्हणजे समाजात आजही मोठे पाप समजले जाते. वास्तविक आजच्या लेखात आम्ही पुरुष व स्त्रियांच्या आपापसातील संबंधांच्याबाबतीत बोलणार आहोत.

आजच्या तरुण पिढीबद्दल बोलायचे झाल्यास तर ही पिढी खूपच मोकळ्या विचारांची आहे. चित्रपटाच्या या युगाने या तरुणांना सगळ्यात जास्त प्रभावित केले आहे. आधीच्या काळात मुलांच्या लग्नाचा निर्णय घरातल्या मंडळींकडूनच घेतला जात असे.पण आता मुले तारुण्यात पाउल ठेवतानाच स्वतःसाठी कोणी न कोणी साथीदार शोधतात. अशात ही देशाची तरुण पिढी धर्म जाती इत्यादी बाबींवर विश्वास ठेवत नाहीत.त्यांचा बालिशपणा इतका वाढत जातो की कित्येकदा ते आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊनही लग्न करतात. एका संशोधनानुसार पती व पत्नी यांचे नाते सगळ्यात अतूट व महत्वाचे आहे. अशात त्यांचे नाते तेव्हाच टिकू शकते जेव्हा ते एकमेकांना नीट समजून घेतील आणि दोघांत समजूतदारपणा असेल. आणि हा समजूतदारपणा तेव्हाच शक्य आहे जेव्हा दोघांच्या वयात जास्त अंतर नसेल. कारण माणसाच्या वयाचे त्याच्या व्यक्तीमत्वाशी गहिरे नाते असते.

अशात जर तुमचा साथीदार तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल तर तो तुम्हाला तुमच्यापेक्षा कमी समजूतदार आहे असे वाटेल आणि साथीदार जर मोठा असेल तर तो तुम्हाला कायमच कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण समजूतदारपणा वयाच्या वाढीबरोबरच येतो. अशात जर तुम्ही तुमच्यापेक्षा कमी वयाच्या माणसाशी लग्न कराल तर तुमच्या दोघात चांगले अंडरस्टैंडिंग राहिलं आणि तुम्ही एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजू शकाल. लग्न हे अनेक जबाबदार्या एकवटलेले नाते आहे. अशात लग्नानंतर तुमच्या व तुमच्या साथीदाराच्या एकमेकांकडून हजारो अपेक्षा असतात जर तुमचा साथोदार समवयस्क असेल तर. कारण इच्छा पूर्ण न करू शकणे हेही नाती तुटण्याचे एक कारण बनू शकते. एकमेकांना नीटपणे समजण्यासाठी समोरच्याच्या भावना समजून घेणे जास्त महत्वाचे आहे. पण वयात खूप जास्त अंतर असण्याने लोकांना नात्यातील तणाव व तत्सम त्रासांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला सांगू की लग्नासाठी नक्क्की किती वयाचे अंतर असायला हवे.

तुमच्या व तुमच्या साथीदाराच्या वयात कमीत कमी एक ते दोन वर्षांचेच अंतर असायला हवे. कारण वयाबरोबरच माणसाची विचारसरणी आणि आवडनिवडही बदलून जाते. अशात जर तुम्ही एकाच वयाचे असाल तर दोघांची आवडनिवडही एकसारखीच राहील. २० ते २२ वर्षाचे वय हे तरुणांच्या मस्तीचे वय असते. अशात जर तुम्हाला तुमच्या वयापेक्षा मोठा साथीदार मिळाला तर त्याच्या दृष्टीने तुमची निवड व स्वप्ने ही नादानी असतील. यामुळे तुमच्या दोघात लहान मोठ्या गोष्टींमुळे तणाव राहू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *