शाहरुख ने विचारला अंबानीच्या मुलाला पगार, मुलाचे उत्तर ऐकून शाहरुखची बोलतीच बंद झाली.

शाहरुख ने विचारला अंबानीच्या मुलाचा पगार, मुलाचे उत्तर ऐकून शाहरुखची बोलतीच बंद झाली.

अंबानी कुटुंबाची गणना देशातल्याच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबात होते. अंबानींच्या कुटुंबाच्या श्रीमंतीची चर्चा फक्त भारतातच  नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावरही अनेकवेळा त्यांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या राजेशाही थाटाची चर्चा होते.  मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल असे म्हटले जाते की मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी यांच्या एक कप चहाची किंमत लाखो रुपयांची आहे.पण, आज आम्ही तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहोत की जे ऐकून तुमची नक्कीच शुद्ध हरपेल.

खरेतर, नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने कंपनीला 40 वर्ष पूर्ण होण्याच्या आनंदात  मुंबईत एक भव्य पार्टी आयोजित केली होती. जसं की आम्ही काही महिन्यांपासून पाहत आहोत, अंबानी कुटुंबाची नवी पिढी ईशा अंबानी, अनंत अंबानी आणि आकाश अंबानी जगासमोर येत आहेत आणि स्वतःला रिलायन्सचे भावी मालक म्हणून सादर करीत आहेत.या  पार्टीत असंच काहीसं पाहायला मिळालं.या पार्टीत सुपरस्टार शाहरुख खानही उपस्थित होते. शाहरुख खान मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात.

शाहरुखला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी बोलावले होते. शाहरुखच्या बरोबरीनेच हा कार्यक्रम ईशा, अनंत आणि आकाश यांनी आयोजित केला होता. तथापि या काळात एक अजब घटना घडून गेली जि सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. वास्तविक या कार्यक्रमात शाहरुख खान अंबानी कुटुंबाच्या नवीन पिढीबरोबर थट्टा मस्करी करत होता. त्या वेळी शाहरुखने विचारले की अनंत अंबानी यांचा पहिला पगार  किती होता. यावर हजरजबाबी अनंतने असे उत्तर दिले की शाहरुख निरुत्तर झाला.

खरं तर पहिल्या पगाराबद्दल अनंताला अनंतला विचारण्याआधीच शाहरुखने आपला पहिला पगार ५० रुपये सांगितला होता. त्यांनतर त्याला अनंतच्या पहिल्या पगाराबद्दल जाणून घ्यायचे होते. पण या प्रश्नाचं उत्तर अनंतने असं दिले की उपस्थित लोक हसू लागले व शाहरुख गप्प झाला. उत्तर देताना अनंत म्हणाला की मी जर तुला पहिला पगार सांगितला तर तू सगळ्यांसमोर ओशाळा होशील. नंतर  यांच्या उत्तरांवरून असे दिसते की त्यांचे वेतन शाहरुखचच्या वेतनापेक्षा खूपच जास्त होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *