व्हिडिओ : मरणापूर्वीच अमिताभने केली घराची वाटणी, कारण आहे मुलगी व सून यांच्यातील भांडण !

मुंबई – अमिताभ बच्चन अभिनयापासून ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्या कामाबद्दल नेहमीच ठळक बातम्यांमध्ये असतात. त्यांनी आपल्या करियर बरोबरच आपल्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. करीयरपासून कुटुंबापर्यंत अमिताभ प्रत्येक बाबतीत अगदी अचूक बसतात. आताच अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून सगळेच हैराण आहेत. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कि अमिताभचा धाकटा मुलगा अभिषेक बच्चन याचा विवाह विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिच्याबरोबर झाला आहे आणि ती सुनेच्या रुपात अमिताभच्या घरात राहते. पण अशी बातमी आहे कि ऐश्वर्या अभिषेकबरोबर ‘जलसा’ सोडणार आहे.

रिपोर्टप्रमाणे अमिताभचा मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय लवकरच अमिताभचे घर सोडून मुंबईच्या आपल्या आरामदायी अपार्टमेंटमध्ये राहायला जाणार आहेत. लवकरच दोघे अमिताभचे जलसा नावाचे घर सोडून दुसर्या घरात राहायला जाणार आहेत. यामागचे कारण अजून नक्की कळलेले नाही कि इतकी वर्षे एकत्र राहिलेले बच्चन कुटुंब अचानक का तुटले. याबाबतीत बातमी अशी आहे कि अभिषेकचे लग्न झाल्यावर ऐश्वर्या राय आणि अमिताभची मुलगी श्वेता नंदा यांच्यात रोज भांडणे होत आहेत.

या आधीही श्वेता आणि ऐश्वर्या याच्या वादाच्या बातम्या समोर आल्या आहेत. असे आहे कि दोघींमध्ये रोज होणार्या वादांमुळे बराच काळ त्यांच्यात संवाद नव्हता. या गोष्टीचा अंदाज तेव्हा लागला जेव्हा फरहा खानच्या वाढदिवसाच्या समारंभात ऐश्वर्या सोडून श्वेता नंदा, अभिषेक बच्चन व अमिताभच्या नाती सामील झाल्या होत्या. यांनतर विराट व अनुष्काच्या मुंबईत झालेल्या स्वागत समारंभातही श्वेता व ऐश्वर्या यांच्यात संवाद झाला नाही.  याचमुळे मीडियात अशा बातम्या समोर येत होत्या कि अमिताभ यांची सून आणि मुलगी यांच्यात पटत नाही.

हेच नव्हे तर श्वेता ही ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चन हिच्या वाढदिवसाच्या समारंभातही कुठेही दिसली नाही. नणंद भावजयीचे हे भांडण आता जगासमोर आले आहे आणि ऐश्वर्या तिचा पती अभिषेकबरोबर अमिताभचे घर सोडणार आहे. यापूर्वी काही वर्षे आधी ऐश्वर्या व अभिषेक यांच्यातील भांडणांच्या बातम्या समोर आल्या होत्या.  दोघांच्या मधील भांडणाचे कारण ऐश्वर्याचे रणबीर कपूरबरोबर ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटातील गरम दृश्य होते. वास्तविक नंतर दोघांचे संबंध सुरळीत झाले आणि लवकरच ते अमिताभचे घर सोडून नवीन घरात राहायला जाणार आहेत.

पहा व्हिडिओ

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *