जर तुम्हीही सकाळी उपाशी पोटी पाणी पित असाल तर हे वाचा नाहीतर पस्तावाल….

माणसाच्या शरीराचा ७० % भाग हा पाण्याने बनलेला आहे. पाणी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक पौष्टिक तत्व आहे.त्याशिवाय आयुष्य शक्यच नाही. पण सकाळी उठून रिकाम्यापोटी पाणी पिणे जास्त आरोग्यदायी मानले जाते. सुप्रसिद्ध डॉ. राजीव दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार सकाळी अंशपोटी प्यायले गेलेले पाणी चांगले असते व ते दम क्षयरोग यांसारख्या अनेक आजारांवर गुणकारी आहे. पण सकाळी पाणी पिताना तुम्हाला महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती अशी कि थंड पाणी पिण्याऐवजी आपण कोमट पाणी प्यायले पाहिजे. कोमट पाणी आपल्या शरीराच्या पचनव्यवस्थेसाठी खूप चांगले व प्रभावी सिद्ध झाले आहे.

पाणी पिताना हळू हळू प्यायले तर तुमच्या तोंडातील लाळ त्या पाण्यात मिसळेल आणि तुमच्या पोटात जाईल ज्याने तुमची पचनव्यवस्था कधीही बिघडणार नाही. यामुळे तुम्ही स्वतःला कोलेस्ट्रोल सारख्या अनेक आजारांपासून दूर ठेवू शकता. आम्ही तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काही फायदे सांगणार आहोत जे वाचून तुम्ही लगेच सकाळी उठून आधी पाणी पिणे सुरु कराल. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात. याशिवाय याने पोट कमी व्हायला मदत होते. जितके पाणी सकाळी उठून प्याल तितके तुमचे शरीर शुद्ध राहील. रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने आपली भूक दुप्पट होते. अशावेळी सकाळचा नाश्ता पोटभर करावा. याने पचन नित राहून पोटाचे विकार दूर होतील.

अनेक लोकांना डोकेदुखीचा त्रास असतो. पाणी योग्य प्रमाणात न प्यायल्याने हा त्रास संभवतो. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने या त्रासापासून कायमची मुक्ती मिळवता येऊ शकते. श्वासाची दुर्गंधी आणि बैक्टीरिया प्रादुर्भाव यांपासूनही आपले रक्षण होते. पाणी आपले कोलन साफ करते.एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पोटातील मळ साफ होतो. याने तुमची त्वचाही तजेलदार होते. तुमचे कोलन साफ असेल तर तुम्ही खर्या अर्थाने निरोगी व्हाल आणि तुम्हाला रोज खूप उत्साह वाटेल. सकाळी उठून कोमट पाणी प्यायल्याने अनेक आजारांचा धोका टळतो जसे कि क्षयरोग, टीबी, डोळ्यांचे आजार, घशाचे विकार वगैरे. याने शरीराची चयापचय क्रिया वाढते आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

म्हणूनच रोज सकाळी उठून सगळ्यात आधी कोमट पाणी प्या व स्वस्थ आणि निरोगी राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *