हे आहे जगातील सर्वात मोठे शिवलिंग, ज्याची लांबी वाढतेय दरवर्षी.

बऱ्याच वेळा तुम्ही ऐकले असेल की महाकाल आणि इतर शिवलिंगांचा आकार कमी होत आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला अश्या शिवलिंगाबद्दल सांगणार आहोत ज्याची लांबी कमी होत नसून, प्रत्येक वर्षी वाढते. हे शिवलिंग भृश्वरनाथाचे आहे आणि ते छत्तीसगढमधील गरियाबंद जिल्ह्यात स्थित आहे. निसर्ग निर्मित हे जगातील  सर्वात मोठे शिवलिंग आहे. हे जमिनीपासून 18 फुट उंच व 20 फूट गोलाकार आहे. दरवर्षी, राजस्व विभागामार्फत हे शिवलिंग मोजले जाते, ज्यामध्ये त्याची दरवर्षी 6 ते 8 इंचाची वाढ होते.

मुख्य शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर हे शिवलिंग मोरडा गावात घनदाट जंगलात आहे.

जगातील सर्वात मोठी शिवलिंग

पूर्वी हे शिवलिंग छोट्या स्वरूपात होते परंतु त्याची उंची आणि लांबी हळूहळू वाढली. या शिवलिंगाला जगातील सर्वात मोठे शिवलिंग असल्याचा मान आहे. हे शिवलिंग आजही वाढत आहे.

दरवर्षी, शेकडो लोक दर्शन घेण्यासाठी आणि जलाभिषेक करण्यासाठी येथे येतात. तसेच दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *