लग्न करण्यासाठी ब्राझील वरून भारतात आली ही मुलगी, परंतु नंतर जो खुलासा झाला त्यामुळे…

2
12

लग्न करण्यासाठी ब्राझील वरून भारतात आली मुलगी,परंतु नंतर जो खुलासा झाला त्यामुळे सर्वच जण हैराण झाले. चला तर जाणून घेऊया ही अनोखी प्रेमकहाणी. फेसबुकवर झाली त्याची मैत्री. ब्राझीलची राहणारी मारथा आणि यमुनानगर येथील अनंत यांची दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली. अनंतने फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली आणि मारथाने ती अॅक्सेप्ट केली.

हळू-हळू दोघांमधील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. अंनतला पोर्तुगाल भाषा येत नव्हती आणि मारथाला पोर्तुगालशिवाय कोणतीच भाषा येत नव्हती. नंतर अनंतने इंटरनेटच्या माध्यमाने पोर्तुगाल भाषा शिकला.त्यांनतर दोघांचे संभाषण सोपे झाले.

त्यानंतर मारथाने आपल्या प्रियकराकडे भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि  मारथा टूरिस्ट वीजावर भारतात आली. 14 सप्टेंबरला ती दिल्लीत पोहोचली. दिल्ली विमानतळावर अनंत तिला घेण्यासाठी गेला. यानंतर अनंतने मारथाला आपल्या घरी घेऊन गेला. ह्या लग्नाला अनंतच्या घरच्यांचा विरोध होता पण अनंतच्या प्रेमापुढे आणि त्याच्या खुशीसाठी कुटुंबानेही हार मानली.

 

यांनतर जो खुलासा झाला त्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मारथा विवाहित असून दोन मुलांची आई आहे. नवऱ्याला न सांगता टुरिस्ट विजाद्वारे ती ब्राझीलहून दिल्लीत आली आहे. मारथा घरी पोहोचली नाही, त्यामुळे पतीने तिचा खुप शोध घेतला. ब्राझील पोलीसांनी शोध घेतला तेव्हा मारथा टूरिस्ट वीजा घेऊन भारतात आल्याचे समजले.

ब्राझील अॅम्बॅसीने तीची लोकेशन तपासली तेव्हा ती दिल्लीत असल्याचे आढळले. त्यानंतर दिल्ली पोलीसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती सढौरमध्ये असल्याचे समजले. गुरूवारी रात्री दिल्ली पोलीस आणि ब्राझील अॅम्बॅसीचे अधिकाऱ्यांनी सढौर येथे पोहोचून मारथाची भेट घेतली. सढौर पोलीसात मारथाने जबाब दिला की, ती स्वत:च्या मर्जीने येथे आली आहे. त्यानंतर दिल्ली पोलीस आणि ब्राझील दूतावासाचे अधिकारी मारथाला आपल्यासोबत घेऊन गेले.

 

त्यानंतर अनंतने सांगितले कि माथरा चे तिच्या पती सोबत पटत नसते आणि त्या दोघांचे नेहमी भांडण होत असते. माथरा आता घटस्फोटाची तयारी करत असून लवकरच घेणार आहे. अशा वेळेस पोलीस सुद्धा काहीही करू शकत नाहीत जेव्हा या दोघांनी हा निर्णय घेतला आहे. शेवटी हा निर्णय त्या दोघांचा वैयक्तिक आहे.

 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here