सुर्यवंशम चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनचा मुलगा बनलेला हा बालकलाकार आता झालाय मोठा, दिसतोय आता असा…

‘सूर्यवंशम’ असा चित्रपट आहे, जो सेट मॅक्स या चॅनेलवर सातत्याने दाखविला जातो. वास्तविक यामागेही एक मोठी स्टोरी आहे. असो, हा चित्रपट वारंवार दाखविला जात असल्याने प्रेक्षकांना चित्रपटातील हिरा ठाकूर, गौरी, मेजर साहब या पात्रांसह ‘जहरीली खीर’ यासारखे डॉयलॉग्सही तोंडपाठ झाले आहेत. चित्रपटात क्लायमॅक्स हिरा ठाकूर बनलेल्या अमिताभ बच्चन आणि त्यांच्या नातवाची चांगली केमिस्ट्री दाखविण्यात आली आहे.

मात्र हाच नातू पुढे डब्यात विष घातलेली खीर त्यांना देतो अन् तेथून चित्रपट एक वेगळेच वळण घेतो. वास्तविक हे सर्व तुम्ही बघितले असेलच. असो, आज आम्ही हिरा ठाकूरच्या त्या चिमुकल्या नातवाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. आनंद वर्धन असे नाव असलेला तो चिमुकला आता हॅण्डसम यंगमॅन बनला आहे. विशेष म्हणजे लवकरच तो चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.  २५ फेब्रुवारीला ‘सूर्यवंशम’ रिलीज होऊन २० वर्ष पूर्ण झाले. याच वर्षात चित्रपटाचा चाइल्ड आर्टिस्ट आनंद आता त्याच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणार आहे.

आनंदने १९९७ मध्ये ‘प्रियारगलू’ या तेलगू चित्रपटातून डेब्यू केला होता. त्यानंतर तो अनेक तेलगू चित्रपटांमध्ये झळकला. तेलगू इंडस्ट्रीमध्ये आनंद एक प्रसिद्ध अभिनेता असून, चाइल्ड आर्टिस्ट म्हणून त्याने २० पेक्षा अधिक तेलगू चित्रपटांमध्ये काम केले. सध्या तो एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असून, लवकरच त्याचा हा शोध संपण्याची शक्यता आहे. त्याला मुख्य अभिनेता म्हणूनच बॉलिवूडमध्ये डेब्यू करायचा आहे.

आनंदने मार्शल आर्टमध्ये ट्रेनिंग घेतले आहे. आनंदचे आजोबा पी. बी. श्रीनिवास एक प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर आहेत. त्यांनी तामीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम् आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. आनंदचे वडील चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आता आनंदला बॉलिवूडचे वेध लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *