म्हणूनच धोनी आपल्या भावाबरोबर राहत नाही, जाणून घ्या का !!

म्हणूनच धोनी आपल्या भावाबरोबर राहत नाही, जाणून घ्या का !!

गतवर्षी धोनीवर आधारित चित्रपट एमएस धोनी , एन अनटोल्ड स्टोरी, हा चित्रपट सगळ्यांना फारच आवडला होता, हा चित्रपट पाहायला तुम्हीही गेला असाल. पण या संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट अजिबात समाविष्ट केली गेली नाही ती म्हणजे महेंद्र सिंग धोनी चा भाऊ नरेंद्र धोनी. संपूर्ण चित्रपटात त्याच्या भावाचा उल्लेख टाळला गेला आहे.

हे सत्य जास्त कोणाला ठाऊक नाही की महेंद्रसिंग धोनीला सख्खा भाऊ आहे  आणि त्या दोघांच्या वयात जवळपास दहा वर्षाचं अंतर आहे. या चित्रपटात महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित सर्वश्रुत नसलेल्या अश्या अनेक घटनांचा उल्लेख केला गेला आहे.पण असं काय कारण होतं की ज्यामुळे संपूर्ण चित्रपटाच्या कहाणीतून त्याच्या भावाला पूर्णपणे वगळले गेले. बहुतेक चित्रपटाचे निर्मातेच यासंदर्भात काही सांगू शकतील.आम्हीही तुम्हाला धोनीच्या मोठ्या भावाबद्दल संपूर्ण माहिती देऊ इच्छितो.

धोनीची मोठी बहिण जयंती जिने त्याला खूप आधार दिला तिचाही उल्लेख या चित्रपटात केला गेला आहे. जेव्हा पत्रकारांनी याबाबत विचारणा केली तेव्हा धोनीने सांगितले “ ही चित्रपटनिर्मात्याची आवड असेल,त्याला मी तरी काय करणार” नरेंद्र हा वयाने सगळ्यात मोठा आहे. ही सगळी भावंडं एकत्रच लहानाची मोठी झाली. त्याच्या मोठ्या भावाची जन्मतारीख २२ ऑक्टोबर १९७१ आहे आणि त्याचे वास्तव्य रांचीमध्ये आहे.व्यवसायाने राजकारणात असलेल्या नरेंद्रने स्वतःला  समाजवादी पार्टीला वाहून घेतले आहे. २१ नोव्हेंबर २००७ मध्ये ते विवाहबद्ध झाले, बायको व दोन मुले असं त्यांचा परिवार आहे.

आधी काही  काळ नरेंद्र कुटुंबाबरोबर राहायचे पण कालांतराने ते स्वतंत्र  राहू लागले.कुटुंबाशी कोणतेही मतभेद नव्हते , नियमित संपर्कात ते राहत असत. एका मुलाखतीत त्यांनी असे स्पष्ट केले की ते जेव्हा १९९१ साली  घर सोडून  गेले तेव्हा माही वयाने फार लहान होता त्यामुळे माहीच्या आयुष्यात त्यांचे काही स्थान राहिले नाही. मानसिक आधार नक्की होता ज्याचं चित्रीकरण केलं जाऊ शकत नाही. साधी राहणी त्यांना आवडते.रांचीमाध्येही ते स्वतंत्र राहतात. जसा सगळ्या देशाला आहे तसाच नरेंद्रालाही माहीचा अभिमान कायमच वाटत राहील.

माहीला मोठ्या भावाबद्दल फारशी जवळीक न वाटल्याने तो त्याच्याबद्दल काहीच वाच्यता करत नाही, त्यांच्यात कोणती नाराजी नाही, अर्थात ही त्यांची खाजगी बाब आहे.

One Comment on “ म्हणूनच धोनी आपल्या भावाबरोबर राहत नाही, जाणून घ्या का !!”

  1. very nice, pan he kharch aahe I agree with this comment. majha wife che name from “S”pasun aahe. Pan mala he patle aahe.

    I am agree with this comment

    Thakyou

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *