उत्तरप्रदेशच्या मुलाच्या भानगडीत भारतात आली जर्मनीची करोडपती मुलगी, त्यानंतर असं काही झालं…

प्रेमात पडलेली व्यक्ती काय करीत नाही ?  प्रेमात कधी व्यक्ती स्वतःचा जीव देते तर कधी दुसऱ्यांचा जीव घेते, किंवा कधी ती जगाशी टक्कर देते. प्रेमात कोणत्याही गोष्टींचे  बंधन नसतं, न जातीपातीचं, ना गरिबी –श्रीमंतीचं. पण जर प्रेम देश आणि सीमारेषा ओलांडून कोणाला भेटायला आले असेल, तर असले प्रेम खरोखरच खास आहे. अशीच एक खास गोष्ट  थेट उत्तर प्रदेशातून समोर  आली आहे, जि पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की खरंच कोणी प्रेमासाठी असं करू शकेल. असे  अनेक लोक असतात जे एकमेकांवर अतूट प्रेम करतात आणि लग्नासाठी कोणत्याही सीमेपर्यंत जातात.

अशीच एक घटना उत्तरप्रदेशातून समोर आली आहे, जिथे एक देशी मुलगा व एक जर्मनीची गोरी मुलगी यांच्या प्रेमाची चर्चा सध्या लोकांच्या तोंडी आहे. संस्कृती, परंपरा, बोलीभाषा आणि विचारांमध्येवेगळेपणा असूनही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मुलगी लग्नासाठी भारतात येऊन दाखल झाली. अहवालाप्रमाणे, मुलाचे नाव अरविंद आहे आणि मुलीचे नाव मारिया हफमन आहे. अरविंद उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्याचा रहिवासी आहे आणि मारिया जर्मनीची.

तथापि, जर्मनीतून परतल्यानंतर अरविंद मर्चंट यांनी नौदलाची नोकरी सोडली आणि पुढे अभ्यास करण्यास सुरुवात केली. काही दोघांनी एकमेकांशी बोलणे चालू ठेवले. जेव्हा सगळं ठीक वाटलं  तेव्हा मारिया लग्नासाठी भारतात आली. परंतु, ही एक आश्चर्याची बाब आहे की दोघांच्या प्रेमावर कुटुंबाचा कोणताही आक्षेप नव्हता.कुटुंबाची परवानगी घेऊन दोघांनी  या वर्षी 21 ऑक्टोबर रोजी विवाह  केला.  मारियाने लग्नानंतर तिच्या विवाह नोंदणीसाठी अर्ज केला आहे.

दोघांचा संपूर्ण हिंदू रितीप्रमाणे विवाह झाला आहे. पण आता मारियाला  अरविंदबरोबर भारतातच राहण्याची इच्छा आहे. लोक या घटनेला प्रेमाचं प्रतिक मानतात.या लग्नाची चर्चा परिसरात सगळीकडे होत आहे. मारियाच्या मते, तिला अरविंदचा साधेपणा आवडला, म्हणून ती आपला देश सोडून भारतात येउन विवाह करण्याचा फार कठीण निर्णय घेउ शकली. या लग्नाच्या चर्चा सगळीकडे होत आहेत. लवकरच न्यायालयाकडूनही  या लग्नाला अनुमती मिळेल, परंतु अशाप्रकारे प्रेमासाठी आपल्या देशाला सोडून येण्याचा निर्णय हे खरोखरच मोठं धाडस आहे, म्हणून मारियावर लोक खूप आनंदी आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *