कानात गोम गेल्यास किंवा चावल्यास काय करायचे उपचार, जाणून घ्या कधी कोणाच्या कामी पडेल सांगता येत नाही…

उन्हाळा सुरु झाला आहे आणि या हंगामात बाहेर पडतात ते किडे. यात सगळ्यात भयानक किडा म्हणजे गोम. याच्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही. गोम चावल्यावर किंवा कानात घुसल्यावर काय करायला हवे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय नक्कीच तुमच्या फायद्याचे ठरतील. काय करावे गोम कानात घुसल्यावर किंवा चावली तर ? गोम ही सापासारखी विषारी मानली जाते. गोम सापासारखीच चावल्यानंतर शरीरात विष सोडते व ते माणसाच्या जीवावर बेतू शकते. गोम चावल्यावर माणसाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि खूप वेदनाही होतात.

हे ऐकून तुम्हाला खूप नवल वाटेल कि गोम चावणे म्हणजे जीवघेणे नाही पण अत्यंत वेदनादायक मात्र नक्कीच आहे. कधीतरी या वेदना असह्य होऊ शकतात. असेही पाहिले जाते कि गोम चावण्याच्या व्यतिरिक्त कानात घुसते. आणि असे कानात घुसणे खूप भयानक आणि धोकादायक आहे. हा प्राणी अंधारात राहतो आणि म्हणूनच तो कानात घुसतो. पावसात हे खूप पाहायला मिळतात. कानात घुसणे खूप त्रासदायक असते आणि गोम कानातही चिकटते आणि तिला नंतर बाहेर काढणे खूप कठीण होऊन बसते. गोम चावल्यानंतर तिचे विष संपूर्ण शरीरात पसरते यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो.

उपाय

जर तुमच्या कानात गोम गेली तर पाण्यात सैंधव मीठ घालून कानात घालावे म्हणजे गोम मरते व कानाच्या बाहेर येते. याशिवाय जर गोम शरीरात चिकटली तर तिच्या तोंडावर साखर घाला म्हणजे ती शरीर सोडून देईल. हळद व सैंधव मिठाचे मिश्रण गायीच्या तुपात मिसळून कानात लावल्याने सुद्धा फायदा होईल. याने गोमिचे विष कमी होईल.

जर का तुमच्या आजूबाजूला किंवा घरात कोणाच्या कानात गोम घुसली किंवा कोणाला गोम जर का चावली तर या सगळ्या उपायांनी नक्कीच फायदा होऊ शकतो. हे उपाय नक्की करून पहा आणि इतरांना ही सांगा. जर माणसाला गोम चावली तर ते नक्कीच प्राणघातक नाही, योग्य उपाय वेळीच केल्यास नक्कीच माणूस त्यातून वाचू शकतो. पण जर का योग्य उपाय वेळेत नाही झाले तर मात्र ते जीवावर बेतू शकते. पण जर का गोम उंदराला चावली तर ते नक्कीच त्याच्या जीवावर बेतू शकते. उंदराचा केवळ ३० सेकंदात मृत्यू होऊ शकतो.

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *