‘वेडात मराठे वीर दौडले सात’ काय आहे या कवितेमागचा खरा इतिहास ?

वेडात मराठे वीर दौडले सात… हे गीत आपण अगदी शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. हे गीत सामान्य गीत नसून एका सत्य घटनेवर आधारित गीत आहे. या गीतात हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या सात मावळ्यांच्या शौर्यगाथेचे वर्णन आहे. घटना अशी आहे कि एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या खजिन्यावर छापा मारला.महाराजांच्या ध्यानात ही बाब आली कि खजिना लुटण्यात त्यांच्या मावळ्यांबरोबर आणखी काही मराठेही सामील आहेत. कचा स्वाभिमानी कडतोजी नावाचा स्वाभिमानी मारतही त्यात सामील होता. खजिना लुटला गेला मात्र वाटण्यांचा प्रश्न उपस्थित झाला. या प्रश्नातून शिवाजी महाराजांनी मैत्रीचा हात पुढे केला. कुडतोजीने शिवरायांशी एकनिष्ठ व्हायचे ठरवले. शिवरायांनी त्याचे नामकरण केले, प्रतापराव गुजर.

नंतर बलोलखानाने स्वराज्यावर चाल केली. जनतेवर अत्याचार सुरु केले. बलोलखानाचा पराभव करण्याचा हुकुम शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना दिला. प्रतापराव गुजर यांनी शिवरायांचा हुकुम लगेचच अमलांत आणला. गनिमी कावा करून त्यांनी बलोलखानाला पराभूत केले. बलोलखानाने शरणागती पत्करली व जीवदानाची याचना केली. असे म्हणतात कि युद्धात शरण आलेल्यांना मारु नये, म्हणून त्यांनी बलोलखानाची सुटका केली. हे समजल्यावर छत्रपती शिवाजी महाराज खूप क्रोधीत झाले. त्यांनी प्रतापरावाला सांगितले कि बलोलखानाला मारा आणि मगच मला तोंड दाखवा. हा आदेश म्हणजे एक प्रकारचा दंडच होता. लगेच प्रतापराव प्रयत्नांना लागले. त्यांना अशी बातमी लागली कि आपल्या छावणीच्या जवळच बलोलखानाचा तळ पडला आहे.ते लगेच घोड्यावरून निघाले आणि हेरांना आक्रमण करायला सांगितले.

या आक्रमणात प्रतापरावांबरोबर विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल आणि विठोजी हे मावळे होते. या सात जणांनी १२ हजार सैन्यात अनेक गनिमांना ठार केले पण हे सात मावळेही मृत्युमुखी झाले. मोठ्या धैर्याने त्यांनी हे केले. महाराजांच्या चरणी असलेल्या निष्ठेमुळे आणि विश्वासामुळेच हे शक्य झाले. या घटनेनंतर महाराजांनी खूप दु:ख झाले. या वीर मावळ्यांचे स्मारक नेसरीजवळ उभारले गेले. याशिवाय राजाराम महाराज यांचे लग्न त्यांनी प्रतापरावांची एक कन्या जानकीबाईं हिच्याशी लावून दिले. या सात वीर मावळ्यांचे बलिदान सार्थकी लागले. यांचा पराक्रम अमर झाला. हा पराक्रम पुढे कुसुमाग्रजांनी गीतबद्ध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *