उन्हाळ्यात काकडी ( वाळूक ) खाल्ल्यामुळे होणारे फायदे पाहून हैराणच व्हाल.

आरोग्य स्वास्थ राखण्यासाठी आपल्या आजूबाजूलाच अनेक गोष्टी असतात. जर त्या सगळ्या गोष्टींचा योग्य प्रकारे वापर केला तर तुम्ही एक निरोगी आयुष्य नक्कीच जगू शकता. यासाठी तुम्हाला योग्य माहिती असणे आवश्यक आहे.आज आम्ही तुम्हाला काकडीबद्दल महत्वाची माहिती देणार आहोत जी ऐकल्यावर तुम्ही काकडीचे नियमित सेवन सुरु कराल. चला पाहूया काकडी तुमच्यासाठी कशी लाभदायक आहे ते. उन्हाळा सुरु होतो आहे. अशात गरमीपासून स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या थंड गोष्टींचे सेवन करता. होय, अशात तुम्हाला काकडी नक्कीच खायला हवी कारण काकडी थंड असते.

उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीरात उर्जेचा संचार होतो. एवढेच नाही तर काकडी तुमच्या तब्बेतीसाठी पण खूप चांगली असते. आज आम्ही तुम्हाला काकडी खाण्याचे फायदे सांगणार आहोत. अशी तर काकडी प्रत्येक ऋतूत पाहायला मिळते पण उन्हाळ्यात ही खाणे खूप लाभदायक ठरते. थंडीत मिळणारी काकडी खाणे टाळले पाहिजे. कारण थंडीत मिळणारी काकडी आरोग्यास फायदा देण्याऐवजी नुकसान देते. काकडी ही उन्हाळ्यातील उत्कृष्ट फळ आहे. कच्च्या काकडीत आयोडीनचे योग्य प्रमाण असते त्यामुळे अनेक रोगांपासून बचाव होतो. चला पाहूया यात काय काय समाविष्ट आहे.

1. काकडीत कैल्शियम फास्फोरस, सोडियम तसेच मैग्नीशियम असते जे शरीरासाठी खूप लाभदायक आहे. 2) काकडीच्या सेवनाने पाण्याची कमतरता दूर होते. कितीही उन्हाळा असो, जर काकडी खाल तर थंड थंड राहाल. उन्हाळ्यात तर नक्कीच काकडी खा, काकडीने शरीरातील घाण साफ होते. 3) जर तुम्हाला सतत भूक लागत असेल तर काकडी तुमच्यासाठी फायदेशीर आहे कारण यात कैलोरी नसतात , ही खाल्ल्याने वजन वाढत नाही. काकडी खाल्ल्याने तुमची लहान भूक संपते आणि वजनही वाढत नाही. 4) जर तुम्हाला तुमचे केस वाढवायचे असतील तर काकडी जरूर खा.काकडीत सिलिकॉन व सल्फर भरपूर प्रमाणात असते ज्याने तुमच्या केसांची लांबी वाढते. म्हणून तुम्हाला काकडी,गाजर आणि पालकाचा रस प्यायला हवा. एवढेच नाही तर हवे असल्यास तुम्ही काकडीच्या रसाने केसही धुवू शकता.

5) जर तुमचे डोके शांत राहत नसेल किवा काळजी राहात असेल ज्यामुळे सतत तुमची चिडचिड होते तर नक्की काकडी खा ज्याने तुमचे डोके थंड राहील व तुम्ही आनंदी राहाल. 6) जर तुमची त्वचा तेलकट असेल तर चेहऱ्यावर काकडी लावा. याचा रस चेहर्याला लावल्याने त्वचेचा तेलकटपणा कमी होईल. त्याशिवाय जर त्वचा फाटत असेल तर काकडी खाऊ शकता. 7) सगळे आजार पोटातूनच सुरु होतात आणि तुमचे पोट जर बिघडले असेल किंवा पोटाचा कोणता विकार असेल तर काकडी नियमित खावी. काकडी थंड असल्याने पोट थंड राहते व पचनशक्ती सुरळीत होते. 8) काकडीच्या सेवनाने मधुमेह व कोलेस्‍ट्रॉल नियंत्रणात राहते. कारण काकडी खाण्याने शरीरातील इन्‍सुलिनची लेवल नियंत्रणात राहाते ज्याने मधुमेहींना खूप उपयोग होतो. 9) काकडीत स्‍टीरॉलही असते जे कोलेस्‍ट्रॉल कमी करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *