तुम्हाला लघवी रोखून ठेवायची सवय आहे का ? भविष्यात होतील हे ४ आजार

0
4

जेवढे जास्त तुम्ही पाणी पिता तितकेच जास्त वेळा तुम्हाला लघवीला येत असते. लघवी वाटे शरीरातील  विषारी पदार्थ बाहेर पडत असतात, परंतु काही लोक कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना बाथरूमला जाण्यासाठी वेळ भेटत नाही. त्यामुळे ते लोक जास्त वेळपर्यंत लघवी रोखून धरतात. जास्त वेळ लघवी रोखून धरल्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात आणि त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. अश्या वेळी जर तुम्ही जास्त वेळ लघवी रोखून धरत आहात तर त्यामुळे उद्भवलेल्या समस्या एकदा जाणून घ्याच.

 

मूत्राशयाला सूज

जास्त वेळ लघवी रोखून धरल्यामुळे मूत्रपिंडाला सूज येते, ज्यामुळे लघवी करताना तीव्र वेदना होते.

 

इंफैक्शन

जास्त वेळ लघवीला रोखून धरल्यामुळे, विषारी पदार्थ मूत्राशया मध्ये गोळा होतात, ज्यामुळे मूत्र संक्रमण होण्याचा धोका असतो

मूत्रपिंड खराब

लघवी रोखून धरल्यामुळे विषारी द्रव्ये शरीराबाहेर होतात परंतु जेव्हा ते बराच काळ शरीरामध्ये थांबतात, तेव्हा मूत्रपिंडाचे नुकसान होते आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा देखील धोका निर्माण होतो.

 

 

मुतखडा होण्याची शक्यता

आपल्या लघवी मध्ये युरिया आणि अमीनो असिड्सचे अनेक प्रकार असतात, जे शरीराबाहेर काढणे खूप महत्वाचे असते. अशा परिस्थितीत, जेव्हा आपण लघवी थांबवतो तेव्हा हे विषारी घटक एकत्रित येतात, आणि त्यामुळे मूत्रपिंडांमध्ये दगड तयार होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here