अरे बापरे चक्क ११ वर्षाचा मुलगा बनला बाप…

लैंगिक अत्याच्यारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असताना न्यूझीलँडमध्ये एका ११ वर्षाच्या मुलांपासून ३६ वर्षाची महिला आई झाली आहे. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षीच हा मुलगा बाप झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ३६ वर्षाची ही महिला या ११ वर्षाच्या मुलांच्या मित्रांची आई आहे.

न्यूझीलँडमध्ये घडलेल्या या घटनेला बाल, युवा आणि परिवार सेवा (सीआयईएफएस) च्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. न्यूझीलँडमधील ऑकलंडमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी ३६ वर्षाची ही महिला गुन्हेगार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. माहितीच्या आधारे असे समजते की, ज्यावेळेस या महिलेने त्या मुलासोबत लैंगिक संबंध केले त्यावेळेस मुलाचे वय ११ वर्ष होते. लैंगिक संबंधासाठी महिलेने मुलावर जबरदस्ती केली होती आणि गरोदर होईपर्यंत जबरदस्ती संबंध ठेवण्यास मुलाला भाग पाडले. अल्पवयीन मुलाने ही घटना आपल्या शाळेतील शिक्षकांना सांगितली. त्यानंतर शिक्षकांनी पोलीस आणि सीआयईएफएसला या घटनेची माहिती दिली.

मुलाच्या वयाबाबत खात्री झाल्यानंतर तो न्यूझीलँडमधील सगळ्यात लहान बाप असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यूझीलँ Tडच्या कायद्यामध्ये पुरूषांनी केलेल्या लैंगिक अत्याचार हा बलात्काराच्या श्रेणीत येतो आणि त्यात दोषी आढळल्यास जवळजवळ २० वर्षाची शिक्षा होते. तर दुसरीकडे महिला या प्रकरणात आढळल्यास तिला १४ वर्षाची शिक्षा केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *