अरे बापरे ! हा साप विकला जातोय ५० लाखाला : पहा नक्की काय आहे सत्य ?

सापाचे नुसते नाव जरी घेतले तरी सर्वसामान्य लोकांच्या अंगावर काटाच येतो.सापाबद्दल भीती, उत्कंठा तर असतेच पण सापाला देवता मानल्याने भक्तीची भावनाही मनात असते. आणि यामुळेच सापाबद्दल अनेक अंधश्रद्धासुद्धा आहेत. विज्ञानामुळे सापांवर गदाच येते आहे असे म्हणू शकतो. खूप अंधश्रद्धा समाजात असल्याने सापाच्या प्रजातींमधील ‘मांडूळ’ जातीचे साप मारले जात आहेत. या प्रजातीचे साप चोरीला जायचे प्रमाणही वाढत आहे. आता पाहूया या प्रजातीविषयी थोडेसे.

सापाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते पण मांडुळ या प्रजातीतील सापांचा मात्र काळी जादू व गुप्तधनासाठी उगाचच बळी घेतला जात आहे. एका मांडूळची विक्री जवळपास २५ लाख रुपयांना केली जात आहे. मांडूळ तस्करी सुद्धा गावखेड्यात खूपच सुरु आहे. मांडूळ साप हा शेतीची जमि मउ करतो. एवढेच नाही तर शेतीमाल खाऊन टाकणाऱ्या उंदरांना संपवून टाकून शेत राखतो. पण हल्ली अंधश्रद्धेमुळे मांडूळांना खूप मागणी आहे आणि या सापाची किंमत जवळपास २५ लाख रुपयांपर्यंत आहे. गुप्तधनासाठी म्हणून या जातीच्या सापांची चोरी खूप मोठ्या प्रमाणावर होतें आहे आणि परिणामी त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. जुन्या काळात बँका नव्हत्या त्यामुळे लोक त्यांच्याकडचे धन शेतातील किंवा घराजवळील जमिनीखाली लपवत असत. अशा प्रकारचे धन शोधण्यासाठी म्हणून या मांडूळांची मागणी वाढते आहे, आणि त्यासाठी लोक मोठी किंमतही मोजायला तयार आहेत असे तज्ञ सांगतात.

मांडूळाचा रंग काळा, लाल किंवा तपकिरी असतो. तो उंदीर, किडे, पाली खातो. हे खाद्य न मिळाल्यास तो मातीमध्ये असलेल्या घटकांवर गुजराण करतो. काही लोक अशी अंधश्रद्धा पसरवत आहेत कि हा मांडूळ घरात जर ठेवला तर त्याने पैसे मिळतात, किंवा हा मांडूळ गुप्तधन शोधण्यास मदत करतो. अशी अंधश्रद्धा पसरवनार्यांवर कडक कारवाई करायला हवी. खूप पैसे मिळवणे, गुप्तधन शोधणे, या गोष्टींसाठी या सापाचा बळी दिला जात असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. एक अशी अफवाही हे लोक पसरवत आहेत कि ह्या प्रजातीच्या सापाला नासामध्ये मागणी आहे. हा सर्प दोन बाजूंनी चालतो आणि हा जर चावला तर कुष्ठरोग होतो. याच्या अंगात विद्युतशक्ती असते. या सापाची इतर नावेही आहेत जसे कि दोनतोंडी मालन, मांडवळ,रेड सँडबोआ वगैरे.

मांडूळ, मांडवळ, रेड सँडबोआ या प्रचलीत नावांबरोबरच दोनतोंडी मालन म्हणून ओळख असलेला साप आहे. तस्कर लोक याला डबल इंजीन असेही म्हणतात. तस्कर असेही सांगतात कि हा डार्क चॉकलेटी, चार किलो वजनाचा आणि पाच फुट लांब मांडूळ ४ करोड रुपयांना विकला जाऊ शकतो. पण हि शुद्ध फसवणूक आहे. इतका मोठा मांडूळ सर्प आढळत नाही, तसे झाल्यास ती एक दुर्मिळ घटना म्हणता येईल. हा साप विषारी नाही आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

हि माहीती सगळ्यांना सांगा, साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, त्याच्या एका दुर्मिळ प्रजातीला वाचवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *