ह्या फोटोमागचे सत्य जाणल्यावर तुम्ही सुद्धा थक्क व्हाल : पहा काय घडलं होतं नेमकं

मित्रांनो, काही छायाचित्रे अशी असतात जि बघूनच पूर्णपणे समजतात आणि आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्राबाबत सांगणार आहोत ज्यामागची कथा इतकी सुंदर आहे की प्रशंसा केल्याशिवाय तुम्हाला राहावणारच नाही. हे चित्र आपल्या कॅमेर्यात कैद केले होते प्रसिद्ध छायाचित्रकार एलिसन बटिगंग यांनी जेव्हा ते केनियात होते.या चित्रात आपल्याला एक हरीण दिसत असेल जे  चित्त्यांच्या तावडीत सापडले आहे पण त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला एक वेगळीच शांतता दिसेल.

या छायाचित्राच्या मागची कहाणी अशी आहे की तीन चित्त्यानी एका हरिणाच्या कुटुंबावर हल्ला केला होता, ज्यात बराच काल धावपळ चालू राहिली आणि अखेरीस या तीन चित्त्यानी एका हरिणाला पकडले. परंतु जर आपण ही छायाचित्रे नीट पाहिलीत तर हे हरीण ना पळून जायचा प्रयत्न करत आहे ना स्वतःला सोडवण्याचा. पण त्याची नजर एका ठिकाणी खिळली आहे जणू काही तो कोणाला पाहात आहे. एलीसन बटिगग सांगतात की हे हरीण एक मादी आहे जिचे दोन बछडे होते आणि जेव्हा चित्त्यानी त्यांच्यावर हल्ला केला, तेव्हा या हरिणीने आपल्या दोन्ही बछड्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण देण्यात धन्यता मानली आणि त्याच वेळी तिचे बछडे तिथून पळून गेले.

आपण छायाचित्रात पाहू शकता की ती एके ठिकाणीच पाहात आहे ज्या दिशेने तिचे बछडे धावत आहेत तरीदेखील त्या हरिणीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही , किंवा तिकडून पळून जाण्याचे प्रयत्न सुद्धा केले नाहीत कारण कदाचित तिला माहित होते की जर चित्ते तिच्या पिल्लांच्या मागे लागले तर त्यांच्या वाचण्याचा काही प्रश्नच नाही. एलीसन बटिगग सांगतात की हा देखावा पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि तिकडे उभ्या सगळ्या लोकांनाही अश्रू आवरता आले नाहीत. कदाचित एका आईचे प्रेमच इतके महान आहे की ज्याने स्वतःचा  जीव धोक्यात घालून आपल्या बछड्यांचा जीव वाचवला.

एलिसन बटिगग म्हणतात की जर एखाद्या पशुची  शिकार होत असेल तर तो तडफडतो , जीवाच्या आकांताने स्वतःला सोडवायचा प्रयत्न करतो पण या मादी हरिणीने तसे काहीच केले नाही व अत्यंत शांतपणे ती तिथे उभी राहिली जणू काही हे ती मुद्दामहून करत आहे. ही एका आईची करुणा आहे जिने आपल्या बाळांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिले. कदाचित म्हणूनच आईला परमेश्वराचा दर्जा दिला गेला आहे, मग ती मनुष्यप्राणी असो किंवा पशु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *