जेसीबीमुळे तुकडे होऊन मेला कोब्रा…त्याचा बदला घ्यायला आली कोब्रा नागीण आणि पुढे जे घडले ते…

नागांच्या कहाण्या तुम्ही अनेक चित्रपटात पाहिल्या असतील किंवा काही पुस्तकातही वाचल्या असतील. अशीच एक कहाणी आज आमच्याकडे आहे. खरेतर घडले असे कि पानिपत येथे खातिमा महामार्गावर पुलाचे काम सुरु होते. तिकडे माती खोदताना एक असा प्रकार घडला ज्याला पाहून मजुरांच्या तोंडाला फेसच आला. खोदकाम करताना एक कोब्रा नागाचे Jcb च्या पंज्यात अडकून दोन तुकडे झाले. त्यांनतर एक नागीण बदला घ्यायला तिकडे पोहोचली आणि कामगारांचा जीव टांगणीला लागून गेला…

नागाच्या मृत्यूने नागीण दुख्खी झाली होती. तिने Jcb जवळ तळ ठोकला. तिकडचा चालक आणि मजूर तिला पाहून घाबरले. त्यांच्या समोर तिने फणा उघडला. सगळ्यांनी घाबरून Jcb जवळून पळ काढला. ती नागीण तिकडे चोवीस तास बसून फुत्कारत राहिली. तिकडे लोक गोळा झाले. एका गारुड्याला तिला पकडायला बोलावण्यात आले त्याने बर्याच प्रयत्न केला पण तो तिला काबूत आणू शकला नाही.

शुक्रवारी सकाळी काही मजूर माती खोदायला तिकडे पोहोचले होते. खोदकाम करताना त्यातून अनेक साप आणि अन्य प्राणी निघाले. त्याच दरम्यान त्यांच्या हातून चुकून एक कोब्रा साप मारला गेला. मेलेल्या नागाला त्यांनी एका नदीकिनारी टाकून दिले. नंतर ते जेवायला बसले. जेसीबी चालकांने जेव्हा पहिला घास घेतला तेव्हा त्याला फणा पसरलेली नागीण समोर दिसली आणि त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. मृत्यूच जणू समोर उभा ठाकला होता. रागावलेली नागीण पाहून चालक घाबरला आणि त्याने पळ काढला. त्यांच्याबरोबर काही मजूरही होते त्यांनीही लगेच पळ काढला. सगळेच थोडा वेळ घाबरले होते. ही बातमी सगळ्या गावात पसरली आणि लोकांचा जमाव आला. लोकांनी तिला पळवायचे खूप प्रयत्न केले पण ती जागची हलली नाही. त्यांनतर गारुड्याला बोलावले गेले. त्यालाही काही जमले नाही. यामुळे सगळेच आणखी त्रस्त झाले आणि काळजीत पडले.

त्यानंतर नागीणीला पकडायला  सर्पमित्र किशन राम सिंह यांना बोलावले गेले. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर तो तिला पकडण्यात यशस्वी झाला. त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या पराक्रमसाठी किशनला पाच हजार रुपये बक्षीस दिले गेले. पकडलेल्या नागीणीला तो आपल्याबरोबर घेऊन गेला. किशन हा अति खतरनाक सापांना पकडण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो सर्पमित्र देखील आहे. तो हे काम तो गेल्या २० वर्षांपासून करत आहे. साप व त्यांचा आचरणाची त्याला संपूर्ण माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *