पूजेचा नारळ खराब निघाल्यास समजू नका अशुभ, हा तर देवाने दिलेला संकेत : जाणून घ्या त्याचा विशेष अभिप्राय 

शुभ असण्याच्या बरोबरीनेच नारळाला लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते. म्हणूनच असे म्हणतात की प्रत्येक पूजेत नारळ असणे गरजेचे आहे. पण अनेकदा असे लक्षात येते की तुम्ही जो नारळ पूजेत वाहिला असेल तो आतून खराब निघाला असेल आणि तुम्हाला असे वाटले असेल की  देवाचा कोप झाला आहे किंवा काही  अघटीत घडणार आहे. खरं तर पूजेचा नारळ खराब निघाला याचा अर्थ असा नाही की काही अशुभ घडले आहे किंवा होणार आहे. याउलट पूजेचा नारळ खराब निघणे शुभ संकेत मानले जाते. याच संकेतांबद्दल आज जाणून घेऊया.

लहानसहान गोष्टी आणि लहानसहान कारणे अनेकदा आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकतात आणि माहिती नसल्याने आपण भ्रमात राहतो. पूजेच्या नारळाच्या बाबतीतही असेच आहे, नेहमी जेव्हा नारळ खराब निघतो तेव्हा लोक शंका घेतात, त्यांना दुकानदाराचा रागही येतो पण सत्य कळल्यावर तसे होणार नाही.हे तुम्हाला माहीतच असेल की हिंदू धर्म सनातन धर्म आहे व ज्याचे स्वतःचे काही निकष आहेत, इकडे प्रत्येक गोष्टीचा विशेष अभिप्राय सुद्धा आहे , आणि तसच  पूजेच्या नारळासंदर्भातही आहे. असे मानले जाते की पूजेचा नारळ खराब निघाला तर त्याचा अर्थ असा होतो की  साक्षात देवानेच स्वतःहून प्रसाद ग्रहण केला आहे आणि म्हणूनच तो नारळ आतून पूर्ण सुखला आहे, इतकंच नव्हे तर तुमची मनोकामना सुद्धा पूर्ण होणार आहे.

पूजेचा नारळ खराब निघणे याचा अर्थ असा आहे की  तुमची मनोकामना पूर्ण झाली आहे. यादरम्यान तुम्ही जि इच्छा व्यक्त कराल ती पूर्ण होईल. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा पूजेचा नारळ खराब निघेल तेव्हा वाईट वाटून घेऊ नका, त्याला परमेश्वराचा आशीर्वाद समजा. यावेळी आपण देवाकडे जे मागणे मागाल ते नक्कीच पूर्ण होईल.

आता आपण सांगू की नारियल योग्य असेल तर मग काय करावे आणि त्याचा काय अर्थ आहे? पूजा करतेवेळी नारळ जर चांगला निघाला तर तो ठेवू नये, प्रसाद म्हणून वाटून टाकावा. यामुळे पूजेचे फळ सगळ्यांनाच मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *