मृत्यूपूर्वी मुलींसाठी किती संपत्ती ठेवून गेली श्रीदेवी ? जाणून घ्या किती होती त्यांची एकूण संपत्ती.

मुंबई- दमदार व सुंदर अभिनयाने लाखो सिनेमाप्रेमींच्या हृदयावर अनेक वर्षांपासून अधिराज्य गाजवणारी बॉलीवुड अभिनेत्री श्रीदेवी हिचे निधन शनिवारी रात्री उशिरा दुबई येथे झाले. रिपोर्टनुसार श्रीदेवी दुबईला कोणत्या लग्नात शामिल व्हायला म्हणून गेली होतो, जिकडे तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला.झटका आल्यानंतर ती बेशुद्ध पडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जिकडे डॉक्टरांनी तिला मृत म्हणून जाहीर केले. श्रीदेवीला हिंदी सिनेसृष्टीची फिमेल सुपरस्टार म्हटले जायचे. बातमीनुसार श्रीदेवी तिचे पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह याच्या लग्नासाठी म्हणून कुटुंबाबरोबर दुबईला गेली होती.आता प्रश्न असा आहे कि तिची एकूण संपत्ती किती होती आणि त्याचा वारस आता कोण असेल?

संपूर्ण बॉलीवूड ला बसला झटका

दमदार अभिनयाने फक्त देशच नव्हे तर जगभरातल्या करोडो लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री श्रीदेवी हिचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. ती ५५ वर्षांची होती. बॉलीवुड अभिनेत्री श्रीदेवीचे निधन आपल्या सगळ्यांसाठीच एक दुख्खद बातमी आहे. ८० च्या दशकात श्रीदेवी बॉलीवुडमधली सगळ्यात यशस्वी अभिनेत्री होती.तिने जवळपास तिच्या प्रत्येक चित्रपटात तिच्या सशक्त अभिनयाने लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवली. तिच्या अचानक झालेल्या निधनावर लोक आपापल्या पद्धतीने दुख्ख व्यक्त करत आहेत.

तिचे वय फक्त ५४ होते. हृदयविकाराच्या झटक्याने तिचे अचानक निधन झाले. तिच्या निधनाने संपूर्ण बॉलीवुडवर दुख्खाची शोककळा पसरली आहे.श्रीदेवीने चित्रपटनिर्माता बोनी कपूरशी लग्न केले होते आणि तिच्या दोन मुली आहेत. तिने तिच्या बॉलीवुड करियरची सुरुवात बाळ कलाकार म्हणून केली होती. आश्चर्याची गोष्ट अशी कि तिच्या निधनाच्या आधी अमिताभ बच्चन यांना त्याची कल्पना आधीच आली होती. अभिताभ बच्चन यांनी ट्विटरवर लिहिले होते कि ‘न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है।’ का माहिती नाही पण एक विचित्र भीती वाटते आहे.

श्रीदेवी,देशातील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती. जी ८० च्या दशकात हिंदी फिल्म उद्योगाची निर्विवादपणे सगळ्यात मोठी स्टार होती. जवळपास ५५ वर्षे वयातही तिचे सौंदर्य तिळमात्रही कमी झालेले नव्हते. पूर्वीसारखीच निरोगी व सुंदर ती दिसत होती. त्यांना पाहून कोणाला वाटलेही नव्हते कि अशा प्रकारे त्यांचे निधन होईल. खरेतर अनेक वर्षांपासून ती कमी चित्रपट करता होती. पण, तिने तिच्या प्रदर्शनाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की ती आताही तीच ८० च्या दशकातली श्रीदेवी आहे. श्रीदेवी आणि तिचे पती बोनी कपूर यांची संपूर्ण संपत्ती $35 मिलियन डॉलर इतकी आहे.

श्रीदेवी ८० आणि ९० च्या दशकातील भारतीय फिल्म उद्योगातील सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तमिळ, तेलगु,मल्याळम आणि कन्नड अशा अनेक भाषांतील चित्रपटात काम केले. यादरम्यान त्यांनी मोठ्या संख्येत लोकप्रिय ब्रांडचा प्रचारही केला. बोनी कपूर व श्रीदेवी यांची एकूण संपत्ती जवळपास $35 मिलियन डॉलरची आहे, ज्याच्या वारस त्यांच्या दोन मुली आहेत. बोनी कपूरने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर श्रीदेवीशी लग्न केले होते.

पहा व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *