वासराला वाचवण्यासाठी लोकांनी फाडले अजगराचे पोट, त्यानंतर जे घडले ते बघून दंगच व्हाल – पहा

असे म्हणतात कि या पृथ्वीतलावर जो जन्माला आला आहे त्याला जगायचा पूर्ण अधिकार आहे. हे अधिकार फक्त मानवी किंवा पाशवी नसतात तर ते सर्वभौमिक असतात. जनावरांच्या अधिकाराचा विषय जेव्हा येतो तेव्हा त्यांची तुलना माणसांशी होते. पण अधिकार म्हणजे खेळणी नव्हेत कि जी एकाकडून हिसकावून दुसर्याला द्यावीत. अधिकार हे सगळ्यांचे आहेत. जनावरांचे अधिकार माणसांच्या अधिकाराला आव्हान देत नाहीत पण फक्त जनावरांच्या शोषणाला विरोध करतात.आपल्याला माणसांशीही वाईट वागायचे नाही व जनावरांचेही शोषण करायचे नाही. एकाला जीवन देण्यासाठी दुसर्याचे जीवन संपवायचे हे योग्य नाही , तर हा एक अन्याय आहे. आणि अशीच एक घटना हल्लीच समोर आली आहे. तो विडीयो वेगाने वायरल होतो आहे.

अजगराचे पोट कापून फाडले.

असाच एक शोषणाचा किस्सा उघड झाला नायजेरियात. इकडच्या स्थानिक लोकांनी अजगराचे पोट फाडले.ऐकून तुम्हालाही वाईट वाटले असेल. खरंच कोणी एखाद्या मूक प्राण्याला इतका वाईट मृत्यू देत असेल ? होय , नायजेरियाच्या लोकांनी ते केलय. त्यांनी एका अजगराचे पोट पूर्ण फाडले. काय कारण होते ज्यामुळे त्यांना त्या जीवाची अशी निर्घृण हत्या करावी लागली ? चला घेऊया जाणून. वेगाने वायरल होणार्या या विडीयोत लोकांनी एका गायीच्या वासराला वाचवण्यासाठी अजगराचे पोट कापून फाडले. झाले असे कि एका स्थानिक माणसाचे वासरू हरवले होते. खूप शोध घेतल्यानंतरही ते सापडले नाही. त्या वासराला शोधत शोधत ते एका झाडीच्या मागे जाऊन पोहोचले.

तिथे त्यांना वासरू नाही पण एक अजगर दिसला ज्याचे पोट फुगलेले होते. तेव्हा त्यांनी हे ओळखले कि या अजगरानेच वासराला गिळले आहे.  त्यांनतर त्यांनी वासराला वाचवण्यासाठी अजगराला मारून टाकण्याचा निर्णय घेतला व अजगराचे पोट कापून टाकले. हे केल्यांनतर जे काही दृश्य दिसले ते पाहून सगळेच उपस्थित लोक खूप थक्क झाले. असे काय सापडले त्या अजगराच्या पोटात जे पाहून सगळ्यांचे होश उडाले ?   त्या अजगराचे पोट फाडल्यानंतर असं लक्षात आले कि त्याच्या पोटात हरवलेले वासरू नव्हे तर अनेक अंडी होती. सगळ्याच्या नंतर लक्षात आले कि ज्या वासराला वाचवायला म्हणून आपण या अजगराचा बळी घेतला ते वासरू खरे तर या अजगराने गीळलेलेच नव्हते तर त्याच्या पोटात फक्त अंडीच सापडली. वासरू वाचवण्यासाठी त्या अजगराचा मात्र नाहक बळी गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *