पोस्टमार्टम रूममधील ‘ते’ सत्य समजल्यावर तुमचे होशच उडतील !

मित्रांनो हा तर निसर्गाचा नियमच आहे की जो या जगात आला आहे तो एक दिवस जाणारच. जसा जन्म होतो तसं मृत्यूही अटळच आहे. माणूस श्रीमंत असो किंवा गरीब, प्रत्येकालाच आपल्या शरीराचा त्याग करावाच लागतो. आज आपण बोलणार आहोत मृत्यूनंतर केली जाणारी महत्वाची क्रिया अर्थात पोस्टमार्टम, त्याबद्दल.

मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी पोस्टमार्टमबद्दल ऐकले असेलच. पण वास्तवात पोस्टमार्टम रुममध्ये नक्क्की काय होते हे कोणीच पाहिले नसेल. अहमदाबादचे  बाबूभाई सितापारा वाघेला जे  गेली अनेक वर्षे पोस्टमार्टमचे काम करत आले आहेत, चला त्यांच्या अनुभवातून जाणून घेऊया पोस्टमार्टमचे खरे स्वरूप कसे असते ते.

बाबूभाई वाघेला यांनी त्यांच्या डायरीत लिहिले आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यात अशा काही प्रेतांचे पोस्टमार्टेम केले आहे जे पाहून सामान्य माणूस चक्कर येउन पडेल. राजकोट जवळ पेडक भागात घडलेल्या एका घटनेबद्दल सांगताना ते म्हणतात की त्यांना एका अश्या प्रेताचे पोस्टमार्टेम करावे लागले ज्याचा मृत्यू आठ दिवसांपूर्वीच झाला होता. त्या डोके कापलेल्या प्रेताला सगळीकडून किडे लागले होते. बाबूभाईंच्या जीवनातला हा पहिला भयंकर अनुभव होता. त्यानंतर अनेक दिवस ते जेवलेही नाहीत .

अहमदाबादमध्ये झालेल्या एका लक्जरी बस व मिनी बस च्या अपघाताबद्दल ते म्हणतात की त्या दुर्घटनेत बसमध्ये असलेल्या अठरा लोकांचा जागीच मृत्यू झाला होता.जेव्हा त्या अठरा प्रेतांना पोस्टमार्टेमसाठी बाबुभाईकडे सोपवले गेले तेव्हा इतकी प्रेते एकत्र पाहून ते खूपच घाबरले. पोस्टमार्टम रूममध्ये जागेचा अभाव असल्याने सगळ्या प्रेतांना पोस्टमार्टम यार्डमध्ये ठेवले गेले व तिकडेच त्यांचे पोस्टमार्टम केले गेले. बाबुभाई सांगतात की त्यांना सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा कोण्या लहान मुलावर सुरी व हातोडा चालवला जातो. बाबुभाईचे वडील व आजोबाही याच कार्याशी जोडले गेले होते. पोस्टमार्टमशी  संबंधित अनेक भयानक सत्यांबद्दल त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *