लाखो तरुणाच्या हृदयाचा ठोका चुकवणारी बघा कोण आहे हि मुलगी…

प्रेम हे कधीही आणि कुठेही होऊ शकतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हायरल होणार व्हिडिओ. जर तुम्हाला त्या प्रेमाची बाधा झाली तर तुम्ही समजू शकता की, त्या प्रेमाला कुणीही अडवू शकत नाही. ते अगदी उगवत्या सुर्याप्रमाणे, बाळाच्या निर्मळ हास्याप्रमाणे पवित्र आहे. प्रेमाची सुरूवात ही नजरेने होतं असं म्हणतात. तुमचं प्रेम हे पहिले तुमचे डोळेच व्यक्त करत असतात.

असाच डोळ्यातून व्यक्त होणारं हे अनोख प्रेम सध्या सोशल मीडियावर भरपूर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमुळे प्रत्येकजण त्याच्या शाळेच्या दिवसांत रमला असेल यात शंका नाही.

या गाण्यात दिसणारी ही मुलगी एखादी साधीसुधी मुलगी नाहीये तर ती आहे मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरीअर. प्रिया ही एक अभिनेत्री असून ती मल्याळम सिनेमा ‘ओरु आदर लव्ह’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ओमर लुलू यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. याच सिनेमातील एक गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले. या गाण्याने थोड्याच कालावधीत इंटरनेटवर लाखो हिट्स मिळवले आहेत. ‘माणिक्य मलाराया पूवी’ या गाण्याने एक दिवसातच प्रिया ला प्रसिद्धीझोतात आणले आहे.

अनेकदा शब्द जिथे कमी पडतील तिथे ही नजरेची भाषा बोलकी ठरते. असाच हा बोलका व्हिडिओ सध्या नेटीझन्सच्या पसंतीला पडत आहे. हा व्हिडिओ व्हॅलेंटाईन विकमध्ये व्हायरल झाल्यामुळे याला अधिक पसंती मिळत आहे. या व्हिडिओतील कादील अदा सगळ्यांनाच घायाळ करत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *