म्हणूनच अमिताभ बच्चनने केले जया भादुरीशी लग्न, कारण जाणल्यावर थक्कच व्हाल.

असे म्हणतात कि जोड्या स्वर्गात बनतात, ही म्हण बॉलीवुडची सुपर जोडी अमिताभ आणि जया बच्चन यांच्या बाबतीत चपखल बसते. बॉलीवुडमध्ये बर्याच चित्रपटकारांनी एकमेकांबरोबर लग्ने केली आहेत पण या जोडीची कहाणी काही वेगळीच आहे. शतकाचे महानायक आणि प्रसिद्ध अभिनेत्री ज्या यांचे एकत्र येणे, एकत्र काम करणे, आणि नंतर आयुष्यभरासाठी एकमेकांचे होऊन जाणे, असे म्हणता येईल कि या जोडीची पटकथा देवानेच लिहिली आहे. आम्ही तुम्हाला या प्रवासाबद्दल माहिती करून देणार आहोत.

अमिताभ आणि ज्या यांची भेट

देवाने प्रत्येकासाठी खास माणसाची निवड केली आहे आणि आपल्याला तोच मिळतो ज्याच आपल्याला गरज असते. अमिताभच्या बाबतीतही असेच काहीसे झाले. वास्तविक ते जेव्हा जया बच्चनला भेटले तेव्हा ते अभिनय क्षेत्रात स्वतःचे करियर बनवण्यासाठी खूप प्रयत्नात होते, चांगल्या चित्रपटाच्या शोधात होते, याच शोधात चित्रपटकार अब्बास यांच्याबरोबर एक दिवस पुण्याला फिल्म संस्थान येथे जाणे झाले, तिकडे पहिल्यांदा त्या दोघांची भेट झाली आणि या पहिल्या भेटीतच अमिताभचा सरळ स्वभाव जयाच्या मनात घर करून गेला.

या दरम्यान जया प्रस्थापित अभिनेत्रींमध्ये साधारण झालेली होती. हे तिचे अमिताभच्या प्रति आकर्षण होते किंवा तिची दूरदृष्टी कि तिला अमिताभच्या प्रतिभेचा अंदाज आधीच आला होता आणि जेव्हा गुड्डी चित्रपटाच्या सेटवर त्यांची दुसरी भेट झाली तेव्हा तिने नजरेने इशाराही केला. खरेतर तेव्हा लोकांनी या गोष्टीची मस्करी केली होती पण हे खरे होणार होते व झालेही.

अमिताभची स्वप्नप्रिया जया भादुरी

असे तर अमिताभच्या अनेक प्रकरणाची चर्चा झाली होती पण त्यांचे हे म्हणणे आहे कि ती जयाच होती जी त्याच्या नजरेच्या पटलावर पहिल्यांदाच आली होती. ७० च्या दशकात एका बातमीत जयाला पाहुन अमिताभला वाटले होते कि त्यांच्या स्वप्नांचे मूर्तिमंत रूप म्हणजे जया आहे. त्यानंतर जेव्हा दोघांनी एकत्र काम सुरु केले तेव्हा ‘एक नजर’ नावाच्या चित्रपटाच्या सेटवर अमिताभच्या या विचारांमध्ये रंग भरले गेले.

अचानक लग्न ठरले व सनईचे सूर वाजू लागले.

अमिताभ व जया यांना एकत्र काम करताना त्यांच्यात मैत्री व प्रेम तर निर्माण झाले होते पण लग्न करायचे काही नक्की ठरले नव्हते. याच दरम्यान त्यांचा चित्रपट जंजीर सफल झाला आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी परदेशात जायचा कार्यक्रम ठरला. पण अमिताभ यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांना हे मान्य नव्हते कि अमिताभनी लग्न न करताच जयाबरोबर परदेशात फिरायला जावे. आणि त्यांनी फर्मान सोडले कि जायचे असेलच तर लग्न करून जा. मग काय ? अमिताभने आपल्या वडिलांची आज्ञा पाळून लग्न ठरवले आणि जीवनसाथी जयाबरोबर नवीन प्रवास सुरु केला.

हा प्रवास त्याच आशेवर आजही सुरु आहे आणि बॉलीवुडची ही यशस्वी जोडी सगळ्यांसाठी आदर्श ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *