जुन्यात जुने पिंपल आणि मुरमाचे डाग तसेच जखमांचे निशाण कायमचे घालवण्याचा घरगुती रामबाण उपाय…

सौंदर्य हे माणसाच्या मनात तर असतेच पण चेहर्यावरही असते. सुंदर दिसायला सगळ्यांनाच आवडते. सौदर्य टिकवणे हे तसे अवघड असते. तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही रामबान घरगुती उपाय ज्याने तुमच्या चेहर्यावरच्या जुन्या पिंपल व मुरुमे किंवा जखमाचे  राहिलेले डाग दूर होतील. चेहर्यासाठी बाजारात अनेक महागडी सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत त्यातले काही आपल्या चेहर्यासाठी हानिकारक तर काही फायदेकारक आहेत. जर घरगुती उपाय केले तर त्याचा प्रभाव कायम टिकतो. घरगुती उपाय जास्त महागडेही नसतात व खात्रीशीर असतात. त्याचे वाईट परिणाम कधीच होत नाहीत. आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे करून तुम्ही जास्त पैसे खर्च न करता त्वचेवरील जुन्या डागांपासून कायमची सुटका करून घेऊ शकता.

कापूर

हा सौंदर्यासाठी खूपच उपयुक्त आहे. याचे महत्व पुराणकाळापासून शास्त्रात विषद केले गेले आहे. याचे अनेक उपयोग आहेत. औषधी रूपातही याचे अनेक फायदे आहेत. कापूर वापरून तुम्ही संकटातूनही मुक्त होऊ शकता आणि तुमची आर्थिक परिस्थितीसुद्धा उंचावू शकते. डोळ्याखालील वर्तुळे दूर करण्यासाठी किंवा जुने डाग असतील तर नारळाच्या तेलात कापूर घालून त्या तेलाचा वापर करावा, नक्कीच फायदा जाणवेल. त्वचेशी निगडीत अनेक समस्या अशा प्रकारे दूर होऊ शकतात.

हळद

फार पूर्वीपासूनच हळद हे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरले जाते. वधूच्या अंगालाही सौंदर्य खुलण्यासाठी हळद लावली जाते. हळदीत नैसर्गिक औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे त्याचा वापर खूपच फायदेशीर ठरतो. हळद घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस व कच्चे दुध मिसळून पेस्ट बनवा व चेहऱ्यावर लावून ठेवा. पूर्णपणे सुकल्यावर धुवून टाका. असे नियमितपणे केल्यावर तुमच्या त्वचेवरील जुने डाग निघून जातील.

नारळाचे तेल

हे बहुगुणी असते. चेहऱ्यावर जर जखमेचे घाव असतील तर सातत्याने नारळाच्या तेलाचा वापर करा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. याने जुने डाग निघून जातील. यात एंटी एजिंग गून आढळतात ज्यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही दूर होतात व चेहरा तरुण दिसू लागतो. डोळ्याच्या आजूबाजूला हातावर नारळ तेल घेऊन काही थेंब मसाज करा. जर केस खूप गुंतले असतील किंवा जटा जास्त झाल्या असतील तर नारळाचे तेल नक्कीच उपयुक्त ठरेल.

पुढील प्रक्रिया व्हिडिओमध्ये पहा:

हे सगळे उपाय नक्कीच करून पहा व कसे वाटले ते आम्हाला नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *