रामायण मालिकेतील सीताचे आताचे फोटोज पाहिल्यावर धक्काच बसेल तुम्हाला.

अनेक वर्षानंतर अशी दिसली रामाची सीता, आता ओळखणे कठीण

आपले सगळ्यांचेच बालपण एका आनंदी पर्वातून गेले आहे.वाल्पानी आम्ही रविवारची वाट पाहत असू.रविवारची प्रतीक्षा फक्त आराम करण्यासाठी नव्हे तर एका वेगळ्या कारणासाठी असे.या दिवसाची लोक आतुरतेने वाट पाहत असत कारण या दिवशी बसून रामायण पाहता येत असे.या काळात जर घरातली वीज गेली तर सगळे वीज असलेल्या घरात पळत आणि रामायण पाहत.रामायणातली सगळी पात्रे आम्हाला तोंडपाठ आहेत.

१९८७ साली रामायणाची सुरुवात झाली.रामायणाने भारतीय जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. असे म्हटले जाते की जेव्हा रामायण सुरू व्हायचे , तेव्हा जसे आजकाल भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान रस्ते ओस पडतात तसे रस्ते ओस पडत होते.

रमानंद सागर यांच्या  रामायणाचे वैशिष्ट्य हे होते की त्यातल्या सर्वच पात्रांनी  भारतीय लोकांच्या मनात एक स्थान निर्माण केले होते. त्यांच्यापैकी एक महत्वाचे म्हणजे आई सीता.

असे म्हटले जाते की सीताच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री दीपिका चिखलिया हिला लोक खरोखरच सीता मानु लागले होते, तिला भेटल्यावर तिला नमस्कार करत होते.त्या काळातील दीपिका सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती. तिने सीतेची भूमिका चोख बजावली. ती या भूमिकेत अशी काही शिरली जणू काही ही भूमिका तिच्यासाठीच बनवली गेली आहे. दीपिकाने सीतेची  भूमिका आपल्या अभिनयासह जिवंत केली.  अनेक लोकांच्या मनात आजही दीपिकाची प्रतिमा सीता म्हणूनच राहिली आहे.

पंतप्रधानांनी त्यांना सन्मानित केले

पंतप्रधान राजीव गांधी यांनीदेखील दीपिकाला आपल्या कामगिरीबद्दल सन्मानित केले. रामायण या मालिकेतून  दीपिकाला इतके मोठे  यश मिळेल असे वाटले नव्हते. पण सिरीयल संपल्यानंतर, दीपिका कुठे हरवली ? रामायणानंतर दीपिका कुठेच  दिसली नाही. पण ती अदृश्य नव्हती. तिचा  विवाह झाला.

कॉस्मेटिक कंपनीच्या मालकाची विवाह

दीपिकाचे  एक कॉस्मेटिक कंपनीचे मालक हेमंत टोपीवाला ह्यांच्याशी लग्न झाले. सध्या दीपिका या कंपनीच्या संशोधन आणि मार्केटिंग टीमचा कारभार सांभाळते. दीपिकाच्या दोन मुली आहेत, त्यांचे नाव निधी आणि जुही आहे.

मोठ्या पडद्यावरून करणार पुनरागमन

एक बातमी आली आहे की छोट्या पडद्यावर आपला प्रभाव पाडल्यानंतर दीपिका एका बॉलीवुड फिल्म मधून पुनरागमन करत आहे.वृत्तानुसार या चित्रपटाचे नाव ‘गालिब’ असेल आणि तो  अफजल गुरूच्या पुत्रा गालिब गुरु यांच्या जीवनावर आधारित असेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *