जाणून घ्या सूर्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा अंत कसा होईल!

65जसा जसा मे महिना जवळ येतो गर्मी खूप वाढते आपल्याला सूर्य नकोसा वाटतो मात्र हाच सूर्य ऐन थंडीत आपल्याला हवाहवासा वाटतो. ऐन थंडीत सूर्यकिरणे अंगावर आल्यास उब जाणवते. सूर्य या तार्याचा अभ्यास करणे ही गोष्ट खूप चांगली आहे अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आज जे ऊन आपण बघतो अनुभवतो आहोत किंवा जी सूर्यकिरणे आपल्याला दिसत आहेत ती खरेतर लाखो वर्षांपूर्वी निर्माण झाली आहे म्हणजे पहा किती वर्षे लागतात सूर्यकिरणे पृथ्वीवर यायला आणि किती मोठा प्रवास करून ती येतात आपल्याकडे !

सूर्याच्या मध्यभागात निर्माण होणारी उर्जा प्रकाशाच्या रुपात बाहेर पडते ज्याला फोटोन असेसुद्धा म्हटले जाते. सूर्याचा आकारच इतका मोठा आहे कि ह्या उर्जेला बाहेर यायला एक लाख सत्तर हजार इतक्या वर्षांचा काळ जावा लागतो. सूर्य हा अतिविशाल तारा आहे.सूर्याची उर्जा खूप आहे .प्रति सेकंदाला ३८ हजार मेगावॉट इतकी उर्जा तो निर्माण करतो.आता प्रश्न असा आहे कि सूर्य अशी उर्जा अजून किती काळ निर्माण करणे आणि देण्याचे काम करेल. चला घेऊया जाणून नक्की सत्य काय आहे ते.

काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांचे असे म्हणणे होते कि सूर्य हा तसच जळत आहे जसे एक साधे इंजिन जळते. त्याची उत्पत्ती ४.५ अरब वर्षांआधी झालेली आहे.हायड्रोजन आणि हेलियम यांपासून बनलेला एक मोठा गोळा म्हणजेच सूर्य होय. त्यांच्या बाहेरील आवरणात लोह सिलिकॉन सल्फर माग्नेशिम असे अनेक घटक समाविष्ट आहेत. आता प्रश्न असा आहे कि याच्याकडे इंधन आहे तरी किती ? हे इंधन संपणार कधी ? व त्यानंतर काय ? १९२० मध्ये केलेल्या अभ्यासानंतर हे लक्षात आले कि ही एक अणूंची प्रक्रिया आहे जी सतत चालू राहणारी आणि मध्ये कधीच खंड न पडणारी अशी आहे.

या अणूच्या प्रक्रियेवर अजून खूप अभ्यास चालू आहे. हा शोध जेव्हा पूर्ण हौइल तेव्हा आपण एका कधीच न संपणाऱ्या इंधनाच्या स्त्रोताचे धनी असू. सध्या अनेक देश या शोधावर एकत्रितपणे संशोधन करत आहेत ज्यात भारत चीन जपान रशिया अमेरिका या मोठ्या देशांचा समावेश आहे. हे संशोधन पूर्ण होण्यासाठी बराच काळ जावा लागेल कारण हा विषय खूप गहन आणि मोठा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *