पैज लावून सांगतो तुम्हाला माहिती नसणार , हे फळ खाल्ल्याने होणारे जबरदस्त फायदे.

तुतीची फळे ही गोड प्रकारची आणि काळ्या रंगाची फळे असतात. काहीवेळा ही फळे लाळ आणि हिरवीपण असतात. हिरवी फळे चवीला आंबट लागतात पण जसे हे फळ पिकू लागते तेव्हा लाल दिसते व पूर्ण पिकल्यावर काळे होते. रोजच्या भाषेत याला तूत असेही म्हणतात. तुतीचे फळ जितके चविष्ट असते तितकेच आरोग्यालाही खूप चांगले आहे. हे फळ पोषणमूल्यांनी पूर्ण आणि गुणकारी असते. यात मोठ्या प्रमाणावर एंटीऑक्सीडेंट असतात. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज असते हे फळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमी पूर्ण होते.

या फळात आयरन, कैल्शियम, विटामिन A मोठ्या प्रमाणात आढळतात. या फळात खास औषधी गूण असे असतात कि उन्हाळ्यात तुमचे उष्माघातापासून संरक्षण होते. चला पाहूया या फळांचे आणखी फायदे. हे फळ त्वचा सुंदर आणि निरोगी बनवते. थंडीत त्वचा शुष्क होते त्यात या फळाचा खूप फायदा होतो. हे फळ त्वचेचा ओलावा टिकवून ठेवते त्वचेचा कोरडेपणा दूर करते. यात असलेले एंटिऑक्सिडेंट्स त्वचेचे तारुण्य टिकवून ठेवतात. ही फळे खाल्ल्याने त्वचा तरुण दिसू लागते.

१) तूतीची फळे खाण्याने पचनशक्ती चांगली राहते. याने सर्दी खोकलाही दूर होतो. पचनसंस्था सुधारते. २) लघवीशी संबंधित समस्यांमध्ये फायदा होतो. ३) डोळे तीक्ष्ण होतात. याने नजरही चांगली होते. ४) उन्हाळ्यात उष्माघातापासून सुटका होते. ५) यकृताशी संबंधित आजार दूर होतात. हे किडनीसाठीही लाभदायक आहे. ६) पोटाशी संबंधित विकार जसे कि बद्धकोष्ठता वगैरे दूर होतात. याने पोट साफही होते.

तूतीची फळे खाय्याने रक्तदाबावर नियंत्रण राहाते. रक्त शुद्ध होऊन रक्ताचे संचरण शरीरात निटपणे होते. रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि हृदयाशी संबंधित विकार दूर होतात. तुतीच्या फळांमधील चमत्कारी गून तुमच्या केसांना निरोगी ठेवायला मदत करतात. याने तुमचे केस निरोगी होतात आणि केसांची गळती थांबते. याने केस स्वच्छ होतात आणि केसांची चमक वाढते. त्याबरोबरच केसांचा नैसर्गिक काळा रंग राखण्यासाठी या फळांचे सेवन खूप फायद्याचे ठरते.

तुतीची फळे खाल्ल्याने होणारे फायदे तुम्ही वाचलेत. आशा आहे कि तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडली असल्यास शेअर करून तुमच्या मित्रांनाही नक्कीच सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *