सर्वात कमी वयात मुख्यमंत्री कार्यालयाचा भार सांभाळणाऱ्या महिला IAS अधिकारी…

आयएएस अधिकारी स्मिता सब्बरवाल यांनी इतिहास रचला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात या पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या सर्वात तरुण अधिकारी बनल्या आहेत. यापूर्वी कधीच एवढ्या कमी वयाच्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री कार्यालयात काम केले नाही. मेअक व करीमनगर जिल्ह्यात कलेक्टर म्हणून काम करताना त्यांनी बरीच कीर्ती मिळवली. सध्या त्या तेलंगणाचे मुख्यमंत्री चंदार्शेखर राव यांच्या अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत आहेत.  त्या २००१ च्या बॅचच्या अधिकारी असून त्यांनी वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी परीक्षा नागरिक सेंवा पास केली.

त्यांच्या सेवेला आता १५ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांच्या कामामुळे त्यांना ‘द पिपल्स ऑफिसर’ म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म पश्चिम बंगाल मध्ये १९ जून १९७७ साली झाला. त्यांचे वडील पिके दास कर्नल म्हणून सेनेतून निवृत्त झाले होते. सैन्याची पार्श्भूमी असल्याने त्यांनी देशाच्या विविध भागात जाऊन अभ्यास केला. त्यांनी हैदराबादच्या सेंट फ्रान्सिस डिग्री कॉलेजमधून वाणिज्य शिक्षण पूर्ण केले. आणि त्यांचे शालेय शिक्षण सिकंदराबादच्या सेंट एन शाळेत पूर्ण झाले.

अगोदर रूग्ण सरकारी दवाखान्यात येण्यास टाळत असत व स्मिता यांनी रुग्णांना सरकारी दवाखान्यात येण्यासाठी विविध योजना राबविल्या. त्या प्रत्येय दवाखान्यात स्काइप सुविधा वापरून लक्ष ठेवत होत्या. गरीब महिलांना खाजगी रूग्णालयात ३०-३० हजार रुपये खर्च करणे परवडणारे नव्हते. त्यासाठी त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून अम्मा लालना ही योजना राबविल्याची माहिती स्मिता यांनी दिली. स्मिता यांनी फकीर रुग्णालयातील सुविधाच नाही तर साफ स्वच्छता टिकवण्यासाठी सुद्धा खूप लक्ष दिले. चांगले उपकरणे त्यांनी सरकारी दवाखान्यात उपलब्ध करून दिले. आज पूर्ण राज्यात स्मिता यांचे मॉडेल पाळले जाते. त्यांनी यासोबतच शिक्षण क्षेत्रात सुद्धा खूप भरीव कामगिरी केली त्यामुळे त्यांना पीपल्स ऑफिसर या पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मिता या गरजू लोकांसाठी नेहमी उपलब्ध असत. असे कधीच नाही व्हायचे की एखाद्याला त्यांची गरज आहे आणि त्या भेटल्या नाही.

त्यांचे लग्न आय पी एक अधिकर्ण अकम सभरवाल शी झाले आणि ते पण तेलंगाना कॅडरच्या अधिकारी आहेत. त्यांची दोन मुले आहेत.  त्यांना दोन मुलं पण आहेत. मुलांना वेळ देण्याविषयी त्यांनी सांगितले की आम्हाला जे आवडायचं ते आम्ही निवडलं आहे, मग मुलांना खूप कमी वेळ मिळतो. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघणाऱ्या महिला आणि मुलींसाठी त्यांचे एक प्रेरणा आहे. पण त्यासाठी त्याग सुद्धा करावा लागतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *