कासवयुक्त अंगठी का घालतात : बघा ह्यामागचे कारण

कासवयुक्त अंगठी  घातल्याने काय होते , घ्या जाणून !!

वास्तुशास्त्र सांगते

ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन अनेक जण हातात रत्न असलेले दागिने घालतात.  ही रत्ने निरनिराळ्या रंगाची असतात. पत्रिकेतील दोष घालवण्यासाठी ह्या रत्नाचा वापर केला जातो. आजकाल रत्नाव्यतिरिक्त विविध प्रकारच्या अंगठ्या लोक घालताना दिसतात, कासाव असलेली अंगठी हा त्यातलाच एक प्रकार आहे.

कासवाची अंगठी

बरेच लोक ही  अंगठी वापरताना दिसतात. ह्या अंगठ्या पाहून बघणार्यांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. असेही वाटते की नक्की काय आहे हे , नवीन फेशन आहे की काय ?  ही अंगठी घालण्याची कारणे आम्ही नेटवर शोधली त्यातली काही तुमच्यासाठी येथे देत आहोत.

दोष निवारण

वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ही अंगठी शुभ मानली जाते.ह्या अंगठीने माणसाच्या आयुष्यातील अनेक दोष दूर होतात. आणि आ महत्वाचं म्हणजे याने माणसाच्या आत्मविश्वासात वाढ होते.

आई लक्ष्मी

शास्त्र असे सांगते की पाण्यात असणारे कासव हे प्रगतीचे प्रतिक असते. कासव हा भगवान विष्णूचा अवतार सुद्धा आहे. समुद्रमंथनाची जुनी कथा असे सांगते की कासवाची उत्पत्ती समुद्रमंथनातूनच झाली आहे. लक्ष्मीचा उगमही तिथूनच झाला आहे.

सुख समृद्धीचे प्रतिक

या एका कारणामुळे शास्त्रात कासवाला महत्व आहे. देवी लक्ष्मीच्या बरोबरीनेच कासवाला धनप्राप्तीची खुण मानली जाते. या बरोबरीनेच हे  धैर्याचेही प्रतिक आहे.

फायदा

इतके लाभ करून घेण्यासाठी ही अंगठी  घालण्यापूर्वी तज्ञव्यक्तीचा सल्ला घेणे महत्वाचे आहे नाहीतर याचे नकारात्मक परिणामही होऊ शकतात.

अंगठी कशी बनवता येईल

चांदीची अंगठी

वास्तुशास्त्र असे सांगते की खरतर कासवाची अंगठी  ही चांदीची असायला हवी.सोने किंवा इतर कोणत्या धातूचा वापर करायचा झाल्यास कासवाचा मूळ आकार चांदीचा बंव्य्न त्यावर रत्न लावले तर चालेल.

ही अंगठी बनवताना हे ध्यानात ठेवले  पाहिजे की कासवाचे डोके हे अंगठी घालणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने असायला हवे. जर दिशा चुकली तर धन आत यायच्या ऐवजी बाहेर जाईल. ही अंगठी मध्यम किंवा तर्जनीत घातली जाते. कासवाचा संबंध लक्ष्मीशी आहे त्यामुळे शुक्रवारी ही अंगठी घालावी. हा दिवस देवी प्रसन्न होण्याचा आहे असे म्हणतात.

ही अंगठी शुक्रवारी घरी आणा व आणल्यावर काही काळासाठी लक्ष्मी च्या प्रतिमेसमोर ठेवा. त्या नंतर दुध पाण्याने स्वच्छ धुवा. उदबत्तीने ओवला व नंतर अंगठी धारण करा. या दरम्यान  महालक्ष्मी मंत्र म्हणू शकता.

अंगठी घातल्यावर फिरवू नका. तसे केल्याने कासवाची दिशा बदलेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *