ज्या घरातील स्त्रिया करतात ही कामे, त्या घरात कधीच येत नाही माता लक्ष्मी.

भारतीय संस्कृतीत घरातल्या बायकामुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशात त्यांच्या शुभ कर्म आणि लक्षणांनी घरात कायमच सुख समृद्धी टिकून राहते. म्हणूनच आपल्याकडे प्रत्येक शुभ कामात घरची लक्ष्मी म्हणजेच सून किंवा मुलीला विशेष महत्व दिले जाते. परंतु याचबरोबर गृहलक्ष्मीच्या योग्य अयोग्य कर्माचा प्रभावही घराच्या सुख आणि सौभाग्यावर पडतो. म्हणूनच घरात लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी हे आवश्यक आहे कि घरच्या लक्ष्मीने काही वाईट व अशुभ कर्मांपासून लांब राहावे. आज आम्ही तुम्हाला काही अशा कार्यांबाबत सांगणार आहोत कि जी करण्याचे घरातल्या स्त्रियांनी टाळले पाहिजे. कारण मान्यतेनुसार जर घरातल्या बायका अशी कामे करत असतील तर लक्ष्मी नाराज होते व त्यांच्या घरात कधी जात नाही.

हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कि लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय असते आणि जिकडे स्वच्छता नसते तिकडे लक्ष्मी कधीच टिकत नाही. पण आजच्या आधुनिक युगात स्त्रिया स्वच्छतेची विशेष काळजी घेत नाहीत असे दिसते. स्त्रिया स्वतःच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात आणि घराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. अशांच्या घरात घाण जमा होते आणि लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. म्हणून जर तुम्हाला लक्ष्मीची नेहमीच कृपा व्हायला हवी असेल तर घराची योग्य ती स्वच्छता ठेवा.

धर्मानुसार झाडूला ही लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशात घरच्या स्त्रियांनी झाडूचा योग्य तो आदर करावा. अनेकदा घरातले लोक खाली पडलेल्या झाडूला लाथ मारतात पण चुकूनही स्त्रियांनी झाडूला पाय लावू नये आणि झाडूला नेहमी योग्य ठिकाणी ठेवावे.

पाहुण्यांना देवाचे रूप मानले जाते अशात घरातल्या स्त्रियांनी चुकूनही आलेल्या पाहुण्याचा अपमान करू नये उलट पाहुण्यांची नीट सरबराई केलेली लक्ष्मीला आवडते त्याने घरात सुख समृद्धी नांदेल.

स्त्रियांनी कधीही घराचा दरवाजा आपटून उघडू नये कारण असे म्हणतात कि आपटल्याने लक्ष्मी नाराज होते.

घरच्या लक्ष्मीने कधीही उंबरठ्यावर बसू नये किंवा तिकडे बसून जेवूही नये. कारण शास्त्रात घराच्या उंबरठ्याला विशेष स्थान दिले गेले आहे.असे मानतात कि तिथूनच लक्ष्मीचा प्रवेश होतो आणि म्हणून तिला आडकाठी करू नये.

धर्मात घरच्या स्वयंपाकघरालाही विशेष महत्व दिले गेले आहे. असे म्हणतात कि स्वयंपाकघर साफ ठेवल्याने लक्ष्मी कायमच प्रसन्न राहते. पण काही लोक ही भांडी तशीच ठेवतात ज्यामुळे लक्ष्मी नाराज होते. म्हणूनच सुख समृद्धी नांदण्यासाठी भांडी रात्रीच घासून धुवून ठेवा व स्वयंपाकघरही स्वच्छ ठेवा.

स्वयंपाक करताना घरातल्या बायकांनी ही काळजी घ्यावी कि जेवण बनवून झाल्यांनतर चुलीवरून तवा किंवा भांडी बाजूला काढावीत कारण उगाच चुलीवर भांडे ठेवणे अयोग्य मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *