तरुण मुलांच्या सततच्या हस्तमैथुनाच्या सवयीमुळे भविष्यात त्यांना कोणत्या समश्याना सामोरे जावे लागते

हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न, गैरसमज, शंकाना आपण ‘प्रश्नोत्तरे’ सेक्शनच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. या लेखात हस्तमैथुनाबद्दलची सर्व माहिती एकत्रित स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे.

हस्तमैथुन म्हणजे काय?

स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुनामध्ये लैंगिक अवयवांना स्पर्श करणे, कुरवाळणे किंवा घासणे या क्रियांचा समावेश होतो. या स्वाभाविक क्रिया आहेत. मुलं-मुली, स्त्री-पुरुषही हस्तमैथुन करतात.

मुली हस्तमैथुन करतात का ? जर होय, तर कशा ?

मुलीही माणूसच आहेत, त्यांनाही मुलांप्रमाणे लैंगिक भावना इच्छा असतातच. मुली आणि स्त्रिया हस्तमैथुन करतात. मुलींच्या लैंगिक अवयवांमध्ये क्लिटोरिस नावाचा एक अवयव असतो. लघवीच्या किंवा शूच्या जागेच्या थोडा वर या अवयवाचं टोक असतं. याला हात लावला, इतर वस्तूंनी त्याला स्पर्श केला किंवा क्लिटोरिस घासलं गेलं तर लैंगिक उत्तेजना निर्माण होते. मुलींमध्ये स्तनाग्रंदेखील अतिशय संवेदनशील असतात. स्तनाग्रांना स्पर्श करणं, ती ओढणं किंवा घासणं यातूनही उत्तेजना निर्माण होते.

हस्तमैथुन केल्याने काय धोका आहे ?

हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. उलट हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुन केल्याने पुढे जाऊन मुल होत नाही, लिंग वाकडे होते, वीर्य वाया जातं, मुल होत नाही, हे सर्व गैरसमज आहेत. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.

हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुन करताना कोणत्या धातूच्या, काचेच्या टोकदार वस्तू वापरल्या तर मात्र लैंगिक अवयवांना इजा होऊ शकते. ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.

किती वेळा हस्तमैथुन करू शकतो?

हस्तमैथुन किती वेळा करावं याचा कोणताही नियम नाही. ज्यावेळी तुम्हाला लैंगिक भावनांचा ताण जाणवत असेल त्यावेळी हस्तमैथुन करावं. मात्र तुमच्या दैनंदिन आयुष्यांमध्ये याचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *