मैदान असो किंवा कैन्सर विरुद्ध लढाई असा होता क्रिकेटर युवराज सिंगचा जीवनप्रवास.

६ बॉल मध्ये ६ षटकार मारणाऱ्या क्रिकेटच्या बादशाहाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. टीम इंडियाचा २०११ विश्वचषकातला सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळविणारा ‘युवी’ आज ३२ वर्षांचा झाला. या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर, जिद्दीवर बरेच जण फिदा आहेत. नुसत्या क्रिकेटच्या मैदानात नाही, तर दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीने युवराज जीवनाच्या रणांगणात अपराजित ठरला आहे. कर्करोगावर मात करत पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करणे यातूनच युवराजची लढवय्या वृत्ती आपल्याला बरेच काही देऊन जाते. युवराजच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यातील आपल्याला जाणून घेण्यास आवडतील अशा काही महत्वाच्या गोष्टी..

युवराज सिंग यांचा जन्म पंजाब येथे 12 डिसेंबर 1981 मध्ये झाला. युवराज हा माजी वेगवान गोलंदाज आणि पंजाबी अभिनेते योगराजसिंग आणि शबनम सिंग यांचा मुलगा आहे. त्याने राष्ट्रीय U१४ रोलर स्केटिंग स्पर्धा जिंकली आहे. युवराजने राष्ट्रीय U१४ रोलर स्केटिंग स्पर्धा जिंकली आहे. पण त्याच्या वडिलांनी त्याचे पदक फेकून दिले आणि स्केटिंग विसरून क्रिकेट वर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला सांगितले. ते प्रत्येक दिवस युवराजचे प्रशिक्षण घेई. त्याने चंदीगड मध्ये डि.ए.व्हि. सार्वजनिक शाळेत शिक्षण घेतले. युवराजने मेहंदी सांगा दी आणि पुट सरदार अश्या चित्रपटात बालकलाकार म्हणून सुद्धा काम केले आहे.

युवराज ने एकदिवसीय क्रिकेट मध्ये 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनिया विरुद्ध पदार्पण केले. त्याने त्याची पहिली कसोटी ही 16 ऑक्टोबर 2003 मध्ये नुजीलँड विरुद्ध खेळला. तो एक डावखुरा आक्रमक बॅट्समन म्हणून नावारुपाला आला. युवराज जेंव्हा फॉर्मात असतो तेंव्हा आपल्या बॅटिंग ने सर्वांना मंत्र मुग्ध करून टाकतो. युवराज स्पिन गोलंदाची पण करतो शिवाय तो एक उत्तम फिल्डर पण आहे.  1999 नंतर युवराज ने चांगली फिल्डींग करून सगळ्यात जास्त रन आउट केले. युवराजने 2007 च्या टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.

२०११ मध्ये त्याला त्याच्या डाव्या फुफ्फुसाचा एक कर्करोगाच्या गाठीचे निदान झाले आणि इनडियनॅपलिस मध्ये बोस्टन मध्ये कर्करोग संशोधन संस्था तसेच वैद्यक सुविधा येथे केमोथेरपीच्या उपचार करून घेतला. मार्च २०१२ मध्ये युवराजला केमोथेरपीच्या तिसऱ्या आणि अंतिम चक्र पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटलमधुन मुक्त करण्यात आले आणि एप्रिल महिन्यात तो भारतामध्ये परत आला. न्यूझीलँड विरुद्ध् टि-२० सामन्यात सप्टेंबर महिन्यात तो क्रिकेटमध्ये पुन्हा परतला.

यवराज सिंग चा 12 नोव्हेबर 2015 ला हेजल किच या बॉलिवूड अभिनेत्री सोबत इंगजमेंट झालं व ते नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन २०१२ मध्ये युवराज सिंह ला भारतातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा अर्जुन पुरस्कार बहाल केला. 2014 मध्ये युवराज ला “पद्मश्री” पुरस्कार देऊन गौरवन्यात आले.युवराज ने कैंसर ला देखील मात देऊन आपल्या समोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. अश्या महान खेळाडुला त्याचा पुढील आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे युवराज. हा लेख तुम्हाला आवडला का? आवडले असेल तर शेअर करून प्रोत्साहन द्या. धन्यवाद…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *